Ooty Diary (Day-7 & final)



आज सायकलिंगचा शेवटचा दिवस होता. सकाळी ६-७-८ च वेळापत्रक होतं. मग काय उठल्या उठल्या ब्रश करून लगेच नाश्ता हाणला. नाश्त्याला गरम गरम पुरी आणि चना भाजी होती. कधी कधी मला असं वाटत कि मी lunch आणि dinner पेक्षा जास्त breakfast ला जास्त खातो. आजही किती पुऱ्या खाल्ल्या काही अंदाज नाही... त्यानंतर गरम दूध प्यायलो आणि मगच सायकलवर टांग टाकली. आज परत उटी मध्ये जायचं होतं. पण इथेच खरी मेख होती.. कारण, काही जणांना अजून खूप सायकलिंग करायचं होत आणि YHAI च्या schedule नुसार आज २०km करून ट्रिप संपणार होती. यावर सगळ्या participants मध्ये कालपासून बरीच खलबतं झाली होती, चर्चा आणि गुप्त मसलती चालल्या होत्या.

आज सकाळी सायकलिंग चालू झालं तेव्हा जाणवलं की प्रत्येकाची सायकल वेगळ्या मूड मध्ये धावते आहे. काही जणांनी सुरुवातीलाच वेगळा रस्ता निवडला आणि थोड्या लांबच्या ठिकाणी सायकलिंग सुरु केलं. काही जणांनी वैतागून लवकर उटी गाठलं आणि सायकल देऊन उटी फिरणं पसंद केलं. आम्ही ७-८ जणांनी मात्र ट्रेक लीडर ने ठरवलेल्या रस्त्याने जाणं पसंद केलं. आज आम्ही जवळजवळ २० km सायकलिंग केलं. सुरुवातीला दोन्ही बाजूला उंच उंच झाडी आणि अतिशय तीव्र पण सुंदर उतार अनुभवला. त्यानंतर आम्ही पाईन फॉरेस्टला भेट दिली. गेले सात दिवस आम्ही उटी मध्ये आहोत पण पाईन फॉरेस्ट हे आम्ही पाहिलेलं पाहिलं "टुरिस्ट" ठिकाण. कारण, आतापर्यंत आम्ही अनुभवलेलं "उटी" हे खूप वेगळं होतं. गावागावातून फिरताना, जंगलातून पेडलिंग करताना, शाळांमध्ये राहताना जे जे उटी आम्हाला दिसलं ते कदाचित कुठल्या टुरिस्ट ला नाही दिसणार.


आजही सुरुवातीचा काही वेळ सोडला तर बाकी आम्ही पूर्णपणे off-road च सायकलिंग केलं. सायकलिंग चा रस्ता अतिशय छोटा अरुंद असा होता, त्याच्या आजूबाजूला फारसं मोठं गाव किंवा मार्केट नव्हतं आणि त्यावर तासभारातून क्वचित एखादी गाडी येत होती. त्यामुळे आजची राईड खूप शांत राईड होती. दुपारचं जेवण तर आम्ही चक्क रोडच्या मध्यभागी बसून केलं. जेवणानंतर मात्र हळू हळू पण लागातार पेडलिंग करीत आम्ही उटी गाठलं. सायकल घेऊनच थोडी शहरात चक्कर मारली, थोडं शॉपिंग केली आणि हॉस्टेल गाठलं. आज हॉस्टेलला आत जाण्याआधी सायकल परत द्यावी लागली. खूप जीवावर आलं होतं.. गेले 6 दिवस ज्या सायकलने चढ, उतार, सकाळ, दुपार, लगातार साथ दिली, जिच्यामुळे उटी फक्त एका हिल स्टेशनच्या पलीकडे जाऊन अनुभवता आलं तिला "Bye" करण खरंच जीवावर आलं होतं. पण त्याला काही पर्याय नव्हता. Thank You Dear..for everything..

सायकल दिल्यावर मग मस्त गरम पाण्याने स्नानम केलंम. मजा आलीम. मला वाटतम रोज रोज अंघोळम करण्यापेक्षा दोन-तीन दिवसानंतर अंघोळम करावी.. त्याने जास्त फ्रेशम वाटत. आंघोळीनंतर थोडा आराम केला. तोवर हळू हळू प्रत्येक जण हॉस्टेलवर यायला लागला होता. प्रत्येकाची जाण्याची लगबग चालू झाली होती. एक दोन जण तर दुपारीच निघून गेले होते. सारं हॉस्टेल कसं रिकामं होऊ लागलं होतं.. खूप विचित्र वाटतं होतं.. प्रत्येक जण जाताना आपल्यातलं काहीतरी आपल्यापासून वेगळं होतं आहे असं वाटत होतं. 'रोजचं एकत्र सायकलिंग, त्या गप्पा, हसणं खिदळनं, एकत्र जेवणं, एकमेकांची खेचणं आणि ते दुसऱ्या गियरवरच 'घोरणं'.. सारंच कसं दूर निघून चाललं होतं.. आता ही जेवणानंतर दोघ जण निघून गेले आहेत..

कुणाची ट्रेन आहे, कुणाची बस आहे तर कुणाची flight आहे.. प्रत्येकाचं जाण्याच माध्यम वेगवेगळं आहे.. पण प्रत्येकाचं एकत्र येण्याचं माध्यम.. कारण.. मात्र एक होतं.."सायकल". दोन चाकांची जादू.. 
आजवर तिच्याकडे मी जे जे काही मागितलं आहे तिने त्याच्यापेक्षा जास्त आणि भरभरून मला दिलं आहे... देते आहे.. त्यामुळे Thank You Dear Cycle.. Love you..

"मिक्का नंड्री उदगमण्डलम्..!!"
(Thank You Ooty)


- फिरस्ती


(Diary paused till next expedition)
#KeepReadingKeepTraveling







Click on the link below to read previous Ooty Diary:

Comments

Popular Posts