हि मा च ल डा य री (Repost - 9)
साधारण 1 वाजता आम्ही मनाली गाठलं. आणि 2 वाजता सोलांग व्हॅली गाठली. आज आम्हाला अजून एक मित्र येऊन मिळाला होता i.e. यश. तस पाहता यश त्याच्या ग्रुप सोबत टूर वर आला आहे. पण आम्ही आलोय म्हटल्यावर खास वेळ काढून तोही आमच्यात सामील झाला. आणि आमचा मनाली मधला guide झाला. त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही आधी सोलांग व्हॅली गाठली. खरतर बर्फाळ डोंगरांचं आकर्षण आधीपासूनच होत पण सोलांग ला पोहचल्यावर मात्र आभाळ भरून आलं होतं. आम्ही जसजसं वर जाऊ लागलो तसतस थंडी वाढू लागली आणि पाऊस बरसू लागला. बर्फाच्या डोंगरांनी पार ढगांची शाल ओढून घेतली. आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण ते काही दिसेनात. मग पुन्हा परतीला लागलो तर खाली उतरल्यावर त्यांनी हलकेच दर्शन दिलं. आह.. धावत जाऊन त्या बर्फात उड्या मराव्याश्या वाटत होत्या. पण ते राहिलंच. मग दिसणाऱ्या हिमालायाला जमेल तसं कॅमेरामध्ये आणि भरभरून डोळ्यामध्ये साठवून आम्ही सोलांग सोडलं.
सोलांग हुन परत येताना आमची परतीची बस हुकली. पण मग आम्ही अजून एक adventure केलं ते म्हणजे, एका टेम्पोच्या मागे बसून इथल्या लोकांसोबत मनाली गाठलं. टेम्पोच्या टपावरून येणारा भन्नाट वारा.. गप्पा आणि दूर दिसणारे बर्फाचे डोंगर.. मजा आली.! मनाली 4km असताना रस्त्यावर "जॅम" लागला आणि गाडी बराच वेळ हलली नाही. मग उरलेलं अंतर आम्ही आमचं सारं बिऱ्हाड पाठीवर लादून पार केलं. थोडा त्रास झाला पण मजा आली..!! मनालीत पोहचल्यावर बऱ्यापैकी थकायला झालं होतं. पण तरी मनाली भटकायचं होतं. मग जवळच असलेली "बुद्धिस्ट monastery" पहिली.. तिथली शांतता.. तिथलं काहीसं गूढ वाटणारं संगीत.. अर्धवट डोळे मिटलेली बुद्धाची मूर्ती.. सारंच कसं हेलकावणाऱ्या मनाला शांत करणारं होतं. आम्ही बराच वेळ तिथं शांत बसून होतो. तिथून मग जवळच असलेल्या मार्केट मध्ये थोडा शॉपिंग नामक प्रकार केला आणि मानालीच बस स्टॅन्ड गाठलं. 9.30 ची चंदिगढ बस पकडण्यासाठी.
मला महितीये की अजून बरच काही बघायचं राहून गेलंय पण निघताना 'हडिम्बा' मातेला 'see you soon' म्हटलंय.
म्हणजे पुन्हा येणं होईलच..!!
आता बसमध्ये आहे..
बस सुसाट चंदिगढ कडे धावतेय..
कदाचित पुढल्या तासाभरात मी हिमाचल बाहेर असेन.. पण "हिमाचल माझ्यातून बाहेर जाणं निव्वळ अशक्य आहे..!''
- आनंद
Thank You my Dear Himachal.. Thank You all.. for being with me..!!
(Diary paused till next journey.. )
Click on the link below to read previous diaries :
https://www.firasti.in/2019/10/Himachaldiaryrepost-3.html
https://www.firasti.in/2019/10/Himachaldiaryrepost-4.html
https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-5.html
https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-6.html
https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-7.html
https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-8.html
www.firasti.in
Comments
Post a Comment