Ooty Diary (Day-0)
गम्मत आहे..
खरतरं आताशा कुठे मी (सदेह)ट्रेन मध्ये बसलोय.. पण या सीट वर माझं मन काल पासूनच बसलं होतं.. म्हणजे आज दिवसभर इकडं तिकडं फिरताना, काही बाही काम करताना मन मात्र "seat no.52, coach.B3, LTT - Coimbatore Express" मधेच रेंगाळत होतं. कॉलेज मध्ये (शरीराने) लेक्चरला असताना मनाचे "या" सीटवर माझे बरेच उद्योग चालू होते.. त्याने मोठी बॅग सीट खाली टाकली होती, छोटी बॅग इथे उशाजवळ ठेवली होती, डाव्या बाजूला एक कादंबरी लोळत होती, कानात गाणी वाजत होती आणि नजर खिडकीबाहेर धावती धावत होती... नुस्ती गम्मत..
असो,
तर मुद्दा हा आहे की, मुद्दा वगैरे काही नाहीये.
तर मुद्दा हा आहे की, मुद्दा वगैरे काही नाहीये.
कारण, काही हि ध्यानी-मनी नसताना आणि कुठलेही गंभीर गहन नियोजन नसताना मी चाल्लोय.
"कुठे ?" - तर "युथ हॉस्टेल" च्या "पश्चिम घाट सायकलिंग" साठी.
खरतरं, गेल्यावर्षी हा बेत केला होता पण मग काही कारणाने तो बारगळला आणि मी मैसूर सायकलिंग केलं. आणि आता आठ-पंधरा दिवसांपूर्वी अचानक भयानक बेत जुळून आला आणि मी निघालो. मुंबईहून मी एकटाच आहे. परवा "उटी" मध्ये बाकीची मंडळी भेटतील. मुद्दा हा आहे की, मुद्दा वगैरे काही नाहीये. आता पुढले जवळ जवळ आठ दिवस मी मनसोक्त भटकणार आहे. सायकलिंग करायचं आहे, नव्या नव्या लोकांना भेटायचं आहे, नवी भाषा कानावर घ्यायची आहे, निसर्ग अनुभवायचा आहे आणि बरंच काही. पण गम्मत हि आहे की इतकं काही काही करायचं असताना आत्ता मन मात्र शांत आहे.
आता मस्त (हवऱ्यासारखा) खिडकीला चिकटून बसलो आहे. बाहेर काही खास असं दिसत नाहीये..अंधार आहे.
पण मनात मात्र चांदणं आहे...चमचमणारं..
पण मनात मात्र चांदणं आहे...चमचमणारं..
- फिरस्ती
07.03.20
07.03.20
Finally again
ReplyDeleteYes..☺️
Delete