Leh Diary (Day-0)

Hi, Hello, नमस्कार, नमस्ते, आदाप, सस्त्री अकाल आणि... "जुले" (लडाखी भाषेत नमस्कार)

खरतर, गेले नऊ दिवस मी लडाख मधेच आहे. वृषाली अणि राहुल-चेतना सोबत पाहण्यासारखी जवळ जवळ सगळी ठिकाण पाहुन झाली आहेत.. "लेह शहर", लेहच्या आजूबाजूची ठिकाण, "पॅनगॉग लेक", "खारदुंग ला टॉप", "नुब्रा व्हॅली", "हुंडर", "डिस्कित मॉनेस्ट्री", "तुरतुक" गाव ते पार पाकिस्तान सीमेजवळच भारताच शेवटचं गाव "थांग". नऊ दिवसात जे अनुभवलं आहे ते खरंच शब्दापल्याडच आहे. लडाख मधले पहाड ते इथली पहाडी, कष्टाळू आणि हसरी माणसं सारच कस स्वर्गवत आहे. इथले उंचच उंच पहाड आपल्याला आपण निसर्गापुढे किती लहान आहोत याची जाणीव करून देतात आणि पहाडावर असलेल्या शांत सुंदर मॉनेस्ट्रीज आपल्याला आपल्या आत डोकावला मदत करतात. 

अफलातून आहे सार..




बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाण जस भटकून झालं आहे तसच जवळ जवळ प्रत्येक भटकायचं "साधन" अनुभवून झाल आहे. म्हणजे - दिल्ली पर्यंत "ट्रेन", दिल्ली ते लेह "विमान", लेहमध्ये जवळपास फिरण्यासाठी "पाय", थोड लांब फिरायला "बुलेट", पॅनगॉग साठी इथली लोकल "एसटी" आणि नुब्रा साठी "कार". आणि आता वेळ आहे... 

माझ्या अतिशय जवळच्या... 

लाडक्या... 

"सायकलची", 

आणि सोबत आहे.. येस "युथ हॉस्टेल"ची..!!


आज सकाळच्याच विमानाने वृषाली मुंबईला परत गेलीय.आणि ती गेल्यावर मी मजबूत भरलेली बॅग पाठीवर लादून २/३ किलोमिटर चालत चालत युथ हॉस्टेल चं बेस कॅम्प गाठल आहे - शुकपा हाऊस, लोअर तुकचा, लेह..! खरंतर आमचं सायकलिंग लमायुरू मधून सुरू होणार आहे पण आमचं रीपोर्टिंग लेह मध्ये आहे. अजून पूर्ण ग्रुप नजरेसमोर आला नाहीये.. पण आजूबाजूच्या टेंट्स मधून येणाऱ्या आवाजावरून पुढच्या सफरीत असणाऱ्या वल्लिची कानओळख मात्र झालेय. अजून एक गम्मत लेह मधे येण्याआधी Money Hiest नावाची वेब सिरीज बघायला सुरू केली होती.. शेवट मात्र राहिला होता. आज युथ हॉस्टेल च्या टेन्ट मध्ये निवांत पडून तो शेवट पाहून घेतला.. काय अफलातून सिरीज आहे.. त्यातलं प्रत्येक पात्र तुम्हाला प्रेमात पाडत.. आणि प्रोफेसर बद्दल तर क्या केहना? अफलातून.. निव्वळ अफलातून.. 


आता रात्रीचं जेवताना बरीच मंडळी भेटली.. वर वर ओळखी झाल्या आहेत.. अजून नावं लक्षात राहिली नाहीयेत.. पण हो, Money Hiest सारखं शहर मात्र लक्षात आहेत.., मुंबई, भोपाळ, कोल्हापूर, अलिबाग, नंदुरबार, बँगलोर आणि ठाणे.. आहे की नाही गंमत.. आता हीच शहर पुढील सात दिवस लेह लामायुरू मध्ये धमाल करणार आहे.. वाह.. 

Bella ciao, bella ciao, bella ciao, ciao, ciao...













Comments

  1. Rekindled my unforgettable visit to Ladakh 4 years back. Waiting to read next blog.
    Tuza Covid space station cha blog pan afalatoon aahe. Covid zala asatana evadha anandi ani positive outlook. Salaam aahe tula. Counselling suroo kar

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much sir. Positivity mhanal tr vsm kadun Ani aplya saryankadunch tr shiklo ahe 😇

      Delete
  2. Whatever bets are in could be made into conditional bets on E that will be truthful on the outset. But, since p is resistant to Dutch books in virtue of being a likelihood operate, no truthful strategy could be Dutch. So, as with Probabilism and Countable Additivity, Conditionalization is each needed and sufficient to 코인카지노 immunize you in opposition to a certain sort of bilking. Mental well being and wellness tips, our latest articles, resources and extra. Personal Financial Strategies for the Loved Ones of Problem Gamblers – How to deal with financial points end result of} a beloved one’s playing. Explain to your associate that you’re seeking assist because of how their playing impacts you and the family.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts