"नस्ती-फिरस्ती...!!"
मेडिकल चेक अप करावयाचं आहे हे समजल्यावर माझ्या रक्तातल्या पेशी पेशी थरथरल्या होत्या. आणि 'बिचारं रक्त' तर शरीरात हाडांच्या कोपऱ्या कोपऱ्यात लपून बसलं होतं. (कुणी सुई टोचून बाहेर काढू नये म्हणून).
पण काय करनार "नाईलाज को क्या इलाज". चेक अप करन माझ्या नशिबातच लिहिलेलं होत.
मला या क्रियेचा अनुभव नसल्यामुळे मी प्रचंड टरकलेलो होतो. आणि ही भीती कमी व्हावी आणि चेक अप साठी काही मार्गदर्शन व्हावं म्हणून मी, माझ्या एका नर्स मैत्रिणीला सम्पर्क केला. अपेक्षा हि होती की तिने माझी अवस्था समजून मला धीर द्यावा..(सांत्वन करावं).
पण तिने मात्र माझ्या जखमेवर एक्दम इंजेक्शन टोचलं.
मला सगळ्यात जास्त भीती होती, ब्लड टेस्ट ची. त्याबद्दल ती म्हणाली, " आनंद, अजिबात घाबरू नको हा... ते फक्त तुला एक मोठी सुई टोचवतील... मग त्या सुईला मागे मोठ्ठा मोठ्ठा पाईप जोडतील... आणि त्या पाईप मधून तुझं रक्त शोषून घेतील... जास्त नाही पण एक ते दोन पिंप रक्त काढून घेतील... आणि मग तुला सोडून देतील..."
हे असले धिराचे (??) शब्द ऐकून मला तर अंगातुन सगळं रक्त पळून गेल्याचा भास झाला. मी भीत भीतच फोन ठेवला आणि मनोमन स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केला.
आणि मग शेवटी तो आजचा क्रूर दिवस उजाडला.......
सकाळपासूनच माझ्या पोटात भीतीचा (आणि भुकेचा) खड्डा पडला होता...
पुढे उभ्या ठाकलेल्या अत्यंत क्रूर चेक अप ची हि जणू काही नांदीच होती...
मी कसं बसं आवरून... काही न खाता पिता...त्या हॉस्पिटल मध्ये दाखल झालो...
माझी अवस्था बघून त्या हॉस्पिटल मधील कुणीतरी मला धीर देईल हि माझी साधी सरळ अपेक्षा होती... पण घडलं ते भलतंच...
चेक अप च्या आधी एक भला मोठ्ठा फॉर्म मला देण्यात आला...(आणि त्याद्वारे माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं)
कारण, त्यात मी आजवर न ऐकलेल्या, न वाचलेल्या आजारांची मोठ्ठी यादीच होती.. आणि 'हे आजार तुम्हाला आहेत का ?' अस विचारलेल होत.
आता तर माझी अवस्था खूपच वाईट झाली होती... ac चालू असूनही मी सारखा सारखा रुमालाने चेहरा पुसत होतो...
शेवटी कसा बसा फॉर्म भरून दिला... मग मला पाठवलं "ब्लड सॅम्पल' साठी...
अत्यन्त जड पावलांनी मी त्या केबिन मध्ये प्रवेश केला... त्या केबिन मध्ये एक अतिशय हिंस्र बाई बसली होती.. मला तिने एका मऊ मऊ खुर्चीवर बसवयास संगीतलं... मग माझ्या (गरीब) डाव्या हाताला घट्ट बांधून ठेवलं..(त्यामुळे शेवटच्या क्षणी उठाव करण्याचा हाताचा विचार फसला)... नन्तर मग त्या हातावर गार गार द्रव्य लावून ती बाई बाहेर गेली... ते काही क्षण माझ्यातल्या रक्तआला अगदी गलबलून आलं... ते काही तरी हालचाल करण्याआधीच ती... हो, हो तीच...हिंस्र बाई हातात एक धार धार टोकदार सुई घेऊन आली...
"ती आली... तिने पाहिलं... हात हातात घेतला... अन मग........."स्स्सस".."आई ग्ग..... :-(("
माझ्या संपूर्ण शरीरात एक अनामिक कळ सरसरून गेली...ती बाई काय करत होती...मला कसलच भान नव्हतं... मी घट्ट डोळे मिटून घेतले होते...
काही वेळाने मी डोळे उघडले तर...
माझ्या डोळ्यात पाणी होत... आणि त्या बाईच्या हातात माझं रक्त... :(
माझं माझ्यापासून वेगळं झालेलं रक्त माझ्याकडे बघून केविलवाणे उसासे टाकत होतं.... माझी अवस्था अगदीच मेल्याहून मेल्यासारखी झाली होती...
आणि ती बाई.... हिंस्र बाई.... माझं रक्त बाटलीत भरून जोर जोरात हलवत होती... आणि अत्यन्त क्रूर असे दात दाखवून कुत्सित हसत होती... तीच ते हसू पाहून मला मनात खात्रीच पटली कि... हिटलर मेला असला तरी तो या हिंस्र बाई च्या रूपाने जिवंत आहे...
त्या धारधार इंजेक्शन ने जिथं माझ्या शरीराला जखम केली होती तिथं एक कापूस आणि चिकटपट्टी लावून मला केबिन मधून बाहेर जाण्यास सांगितलं गेलं...
मी माझा दुखावलेला हात आणि दुखावलेल मन घेऊन ... भीत भीतीच दुसऱ्या केबिन मध्ये गेलो...तिथे पुढे काय वाढून ठेवली याची प्रचंड धास्ती होती...
आणि गेल्यागेल्याच तेथील बाईने...(हिंस्र बाईने) मला माझं शर्ट काढायला सांगितलं..... मी काही क्षण गोंधळलो... बावरलो... तर ती परत म्हणाली..."remove ur shirt.."...
मला काय करावं सुचत नव्हतं... मी भीत भीत ...लाजत लाजत शर्ट काढला... तर त्यावर अजून तीच समाधान झालं नसावं म्हणून अजून ती ओरडली... "remove ur बनिअन"...
आता मात्र कहरच झाला...... असं वाटत होतं.."काढलेलं शर्ट तसेच परत घालावे आणि तडक निघावे त्या मेडिकल जंजाळातून बाहेर... आणि महाराजांनी जशी आग्र्याहून सुटका केली तशी करून घ्यावी सुटका या चेक अप मधून... पण हा विचार करेस्तोवर ती बाई परत ओरडली... मग मी गप गुमान बनियन काढून तिच्यासमोर गप गार झालो.....
आधी तिने अगदी इमानदारीत bp वगैरे चेक केलं... आणि ते आपलं स्टेथस्कोप लावून...श्वासघ्यासोडा पण करायला लावलं...
मी मनात म्हटलं... हे तर खूप सोप्प आहे...
पण खरा वार तर तिने नंतर केला...
तिने माझ्या हाताच्या बोटांना , पायाला अगम्य चिमटे लावले... मला तर एकदम तो मेंटल हॉस्पिटल मधील शॉक ट्रीटमेंटचा सिन आठवला... मी स्वतःशीच स्वतःच नाव..पत्ता..असं सगळं पुटपुटत होतो... (म्हटलं शॉक दिल्यावर मेमरी लॉस झाला तर... एवढं तरी लक्षात राहावं...)
पण त्या बाईने मग हद्दच केली... तिने चक्क जेली ची बाटली माझ्या अंगावर ओतली... आणि काही बाही त्यावर चिकटवू लागली...अत्यन्त रडवेल्या अवस्थेत मी अत्यन्त जोर जोरात हसत होतो... ती बाई मला गुदगुल्या करतेय असच वाटत होतं....
मी वेड्यासारखा हसत होतो... अन ती बाई क्रूरपणे माझ्याकडे पाहत होती...
शेवटी तिने ते साऱ्या वायर्स माझ्या शरीरावरुन काढल्या...(पण ती जेली मात्र माझी मलाच काढायला लावली..)
खरतर, मला मोठ्याने म्हणावंसं वाटत होतं, "मी जेली लावली नाही..मी जेली काढणार नाही.."
पण म्हटलं जाऊदेत...असं बोललो तर ती बाई जेली काढणं सोडून अजूनच गुदगुल्या करेल...
Finally, ते abcd ecg का काय ते झालं आणि मी बाहेर... आलो...
मग मला बोलवलं गेलं xray साठी...
तिथे आता काय होईल या विचारात मी आत गेलो... त्यांनी मला एका विशिष्ट जागी मान ठेऊन उभ केला... मी पुढे काय होईल... इथं हसवतील कि रडवतील..किती त्रास होईल... या विचारातच होतो...पण इतक्यात तो इसम मला म्हणाला, "सर, तुम्ही जाऊ शकता..xray झाला..!"
मला तर काही क्षण कळेचना...
पण मग त्या भल्या इसमास छान smile दिली...thank you म्हणालो आणि निघालो... मनात एकच विचार होता... "सगळ्या डॉक्टर, नर्स लोकांनी या xray वाल्यासारखं असायला हवं...यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं...
साला, तुम्हाला काय चेक अप करायचंय ते करा..पण या xray वाल्यासारखं करा... अत्यन्त शांतपणे..."
शेवटी... वजन, उंची... असं शालेय चेक अप करून मला... दोन तासांच्या वेदनादायी अनुभवातून मुक्त करण्यात आलं...
मी मान खाली घालुन हॉस्पिटल सोडलं..
आणि तडक हॉटेल गाठलं... (उपाशी गरीब बिचारं पोट भरण्यासाठी..!)
धन्यवाद,
(Finally) आनंद
छान
ReplyDeleteछान
ReplyDeleteमस्त ! ! !
ReplyDelete