हि मा च ल डा य री (Repost - 8)
तसं पाहता सायकलिंग आणि युथ हॉस्टेल सोबतचा ट्रेक कालच संपला होता. पण प्रवास आणि हिमाचल चा सहवास संपला नव्हता. आणि हाच प्रवास आजही सुरु राहिला. आज भटकायला आम्हाला अजून एक वाराणसी वाला मित्र भेटला होता i.e.मयंक. सकाळी 9ला नाश्ता (मजबूत) करून आम्ही औट बेस कॅम्प सोडलं. आणि थेट कुल्लू गाठलं. खरतर कुल्लू च्या ऐवजी मनाली जायचा बेत होता पण चुकून (fortunately) आम्ही जी बस पकडली ती कुल्लू पर्यंत होती. मग उतरल्यावर कुल्लू फिरायचं ठरलं. पण फिरणं म्हणजे फक्त भटकणं नव्हे.. तर "कुछ तो तुफानी" करायचं होत. या तुफानी पणाची सुरुवात झाली रिव्हर राफ्टिंग पासून.
माझ्या आयुष्यातलं हे पहिलं रिव्हर राफ्टिंग होतं (आणि तेही बियास मध्ये..!!). मग काय थेट बियास..!! औट ला शांत असणारी बियास कुल्लू मध्ये अवखळ आणि अल्लड होती. त्यामुळे राफ्टिंग ला धम्माल आली. बोट चालवणारा मार्शल आम्हाला राफ्टिंग चा अगदी पुरेपूर आनंद देत होता. कुठे संथ पाणी, कुठे उसळणाऱ्या लाटा आणि कुठे हळूच गिरकी घेणारी बियास आणि या साऱ्यातून हलत डुलत जाणारी बोट.. भन्नाटच..!! अधून मधून थंडगार पाणी झपकन समोरून उसळून अंगावर येत होतं. आणि त्यात तन आणि मन अगदी नखशिखान्त भिजत होतं. धमाल आली..!!
पुढे आमचा प्लॅन होता Paragliding करून मनाली गाठायचा. पण Paragliding साठी आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा पावसाने परत रिमझिम चालू केली.. आणि वाऱ्यानेही आपला वेग वाढवला होता. त्यामुळे आज paragliding होईल असं वाटत नव्हतं. जमलेली सारी गर्दी पुन्हा पांगली होती. पण आम्हाला परतीचा पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही
जवळ जवळ 3 तास वाट पहिली. आणि आमच्या नशिबाने वातावरण पुन्हा clear झालं. हवा शांत झाली आणि सूर्याने दर्शन दिलं. आणि आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा उडायला सज्ज झालो. पण जिथून उडायचं होत तिथपर्यंतचा प्रवास जास्त intresting होता. कारण कुल्लू पासून paragliding point पर्यंत जाण्यासाठी आम्ही जवळ जवळ 3 गाड्या बदलल्या. आणि अक्षरश: अदभूत रस्ते अनुभवले. त्या अतिशय खतरनाक रस्त्यावर इथले ड्रायव्हर्स वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवत होते. आणि हा अनुभव श्वास रोखायला लावणारा होता. जेव्हा वर पोहचलो तेव्हा जवळ जवळ 6,500ft उंचीवरून काही पागल लोकं दरीत झपाझप उड्या घेत होती. आणि अमच्यासारखी वेडी लोकं उड्या मारायला तयार होत होती. आधी खरच किंचित भीती वाटली पण मग म्हटलं जे होईल ते होईल, atleast काही क्षण खुल्या आभाळात जगता तर येईल.!
आणि मग तो क्षण आला.
सर्व तयारी करून प्याराशूट च्या पायलट सोबत धावायला सुरुवात केली आणि.... आणि पाय आणि मी हवेत..!! अविश्वसनीय क्षण होता तो..!! खरच मी उडत होतो..! समोर हळू हळू होणारा सूर्यास्त, आजूबाजूचे पहाड, नागमोडी रस्ते, झाडं, घरं, नदी सारं सारं किती सुंदर दिसत होतं.. शब्दातीत..!! काही मिनिटं पूर्ण हवेत होतो मी. पायलट मस्त हवेत गिरक्या घेत होता आणि मी खळखळून हसत होतो..!! कारण .. मी हवेत होतो..!!
काही मिनिटांनंतर जेव्हा खाली लँड झालो तेव्हा प्रचंड आरोळी दिली.. येस... "अपने होने को मुझको यकीन आ गया..!!" तो प्याराशूट आणि बाकी security belt बाजूला काढायचंही भान नव्हतं. आधी उतरलेले मित्र photo, videos काढत होते. टाळी देत होते. आणि शेवटी होती ती घट्ट मिठी.. येस..! Thts it..!!
paragliding नन्तर मनाली, सोलांग व्हॅली ला जाणं अशक्य होतं. त्यामुळे आता परत औट बेस कॅम्प ला आलो आहोत. उद्या काय करायचं यावर गप्पा चालू आहेत.... मी मात्र शांत आहे.. कारण "I am feeling like, I am still flying in the sky..!!"
- आनंद
Click on the link below to read previous diaries :
https://www.firasti.in/2019/11/Himachaldiaryrepost-7.html
Comments
Post a Comment