हि मा च ल डा य री (Repost - 7)
कालची रात्र फारच धमाल होती.. इवल्याश्या tent मध्ये, एका ब्लब च्या अंधुक उजेडात जमलेली मैफिल खरंच शब्दातीत होती. अविस्मरणीय..!!
कालपासूनच इकडंच वातावरण अगदी पावसाळी पावसाळी आहे. आजची सकाळी ही अगदी थंड आणि अंधारलेली होती. कुठल्याही क्षणी जोरात पाऊस येण्याची श्यक्यता होती. आणि पाऊस म्हणजे इकडं सायकलिंग करताना सगळ्यात मोठी risk. कारण इथले रोड आणि उतार पावसात अतिशय भयानक होतात. आणि आजची राईड होती "जिभी ते औट बेस कॅम्प". म्हणजे जवळ जवळ पूर्ण उताराचीच. जे अंतर कापायला दोन दिवस घेतले ते अंतर आज एका दिवसात पार करायचं होतं. त्यामुळे सकाळी पटापट आवरून आम्ही 9 ला जिभी सोडलं. जिभी हुन थोडं बाहेर पडेस्तोवर पावसाने आम्हाला गाठलं. थंडगार आणि टपोरे थेंब हेल्मेट वर टपटप बरसले. खरंतर एका बाजूला गम्मत वाटत होती पण त्याचवळी थोडी रस्त्याची काळजीही वाटत होती. पाऊस तसा रिमझिम होता पण रस्ता आणि मन ओलं करणारा होता.
आजचे रस्ते कालच्या मानाने खूप चांगले होते पण पावसाने काहीसे निसरडे झाले होते. रस्त्याची वळण फारच विचित्र होती. त्यात येणारी जाणारी वाहनांची वर्दळ जरा जास्त होती. त्यामुळे उतरताना प्रचंड सावध होऊन सायकल चालवावी लागत होती. ब्रेक वरचे हात तर पूर्ण आवळून ठेवावे लागत होते. कारण उतरताना सायकल झटकन अफाट स्पीड घेत होती. त्यामुळे आजची राईड फारच सावध राईड होती. प्रत्येक जण वेगवेगळ्या स्पीड ने वेगवेगळया लेव्हल ला पेडल करत होता. पावसाची रिमझिम अधून मधून चालत होती. आणि पावसाने रस्ता आपलं रूप बदलत होता.
त्यामुळे तीन तासांची राईड अतिशय tensionपुर्ण होती. शेवटी औट जवळ आल्यावर थोडं tension कमी झालं. आज औट ला येताना आम्ही औट च्या बोगद्यातून आलो. Aut tunnel हा तीन किलोमीटर चा अतिशय भन्नाट बोगदा आहे. त्यातून फक्त सायकल चालवणं म्हणजे देखील एक adventure आहे. कारण 3km हे खरंच कमी अंतर नाहीये. आज बोगदयातले ते क्षण खरच श्वास रोखायला लावणारे होते. निव्वळ भन्नाट.
परत औट ला आल्यावर जेवण झालं. आणि सायकल युथ हॉस्टेल ला जमा केली. गेले काही दिवस साथ देणारी नितांत सुंदर सायकल जमा करणं खरच जीवावर आलं होतं. या दोन चाकांमध्ये नेमकी काय जादू आहे माहित नाही पण मी यांच्या प्रेमात पडलोय हे नक्की..!
आज officially आमचा सायकल ट्रेक संपला. कुणालाच इथून निघावस वाटत नव्हतं. पण जाणं तर भाग होतं. बऱ्याच जणांनी आपापल्या वेळेनुसार बेस कॅम्प सोडला. प्रत्येक जण जाताना का कुणास ठाऊक पण भरून येत होतं. चिकू पाजी, जय पाजी, पिनाक भाई, चंगु मंगु, पॉल, निदिल सारीच मंडळी खूप छान होती. खरंतर एका ट्रेक ची, काही दिवसांची मैत्री आमची पण जणू एक family झाली होती. निघताना प्रत्येक जण एकमेकांना पुढच्या प्रवासासाठी "पॉल द बेस्ट" (आमच्या टीम मध्ये असलेल्या पॉल मूळे आमचं ऑल द बेस्ट पॉल द बेस्ट होतं)देत होता.
आता आम्ही 4 ते 5 जण हॉस्टेल ला आहोत. नवीन batch इथं हजर झालीय. आणि आमची ही निघायची वेळ झालीय. उद्या हॉस्टेल सोडायचं आहे.. पण हिमाचल अजून फिरायचं आहे..
- आनंद
Click on the link below to read previous diaries :
मस्त शब्दांकन आणि फोटो. लगे रहो फिरस्तीवाले
ReplyDelete