Leh Diary (Day-4)
जुले.. काल काहीच्या काही अद्भुत राईड मारली होती.. त्यामुळे रात्री एकदम गाढ झोप लागली होती, गाढ आणि एकदम स्वप्न विरहित.. सकाळी उठलो तेव्हा कमाल फ्रेश वाटत होत. प्रथेप्रमाणे मस्त आंघोळीची गोळी घेतली आणि नाश्त्या वर तुटून पडलो. आज बर्याच दिवसांनी पोहे मिळाले.. कालच्या चढाने आमच्या दोन मित्रांची तब्यत खराब केली होती.. त्यामुळे त्यांनी सायकलिंग थांबवण्याचा निर्णय घेतला अणि गाडीने थेट लमायुरूला निघून गेले. आजचा आमचा पल्ला होता "शकर दो" ते "हेनिस्कोट". एकूण अंतर होत साधारण 30/35 किलोमीटर , अणि मुख्य म्हणजे त्यात कालच्या इतका भयंकर चढ नव्हत. म्हणून निवांत रम्मत गम्मत निघालो. सकाळच्या वातावरणात मस्त मजा येत होती सायकल चालवायला. आजचा रस्ता हा विराण डोंगरातून नाही तर कारगिल च्या छोट्या छोट्या गावातून जात होता. मोजकी मोजकी घरं अणि थोडी फार शेतं असलेली चिमुकली गावं. गावातून पास होताना लहान थोर सारे रस्त्यावर येऊन आमच्याकडे कुतूहलाने पाहायचे.. त्यात लहान लहान मुल तर धावत रस्त्यावर येऊन टाळी साठी हात लांब करायची.. आम्हीही मग सायकल एका हाताने सांभाळून दुसर्या हाताने त्यांना अलग...