जॉर्ज तिरुपती..!!
नुकतच तिरुपतीला जाण्याचा योग आला. खरतर माझी तिरुपतीला जाण्याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे बंगलोर हून कितीला निघायचं, साधारण पोचायला किती वेळ लागतो, तिथे जाऊन तिकीट आणि राहण्याची व्यवस्था कशी करायची आणि पुढे दर्शनाला किती वेळ लागणार याचा पुरेपूर अंदाज होता. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे बेंगलोर ते तिरुपती रस्ता माझा अत्यंत आवडता होता..सुसाट... म्हणजे एकदा का आपली आवडती प्ले लिस्ट ट्यून केली की मग मी_गाणी_रस्ता_गाडी कस एकरूप होऊन जातो.. वेगळीच तंद्री लागते.. मग बाकी गाडीत कुणी जागं असो वा निद्राधीन असो त्याचा फारसा काही फरक पडत नाही.. तर.. यावेळी ही अगदी निवांत.. आनंदात तिरुमला गाठलं. पहाटे साधारण 3 वाजता आम्ही तिरुमला मध्ये पोचलो. तिथं थोड थांबून, फ्रेश होऊन तिरुपतीला जायला निघालो.. खर सांगू, तिरुपतीच्या व्यवस्थापनच मला खरच अप्रूप आहे.. म्हणजे इतक्या लोकांचं राहणं, रांगेची व्यवस्था, स्वच्छता,रांगेत पाणी, खान, इत्यादी ची काळजी घेणं.. (आणि मुख्य म्हणजे लाडू) कमाल आहे. आणि हो तिरुमला हून तिरुपती ला जाताना होणारी तपासणी (Checking) हा अजून एक व्यवस्थापनाचा चांगला भाग. तपासणीत सुरक्षा हा एक भाग...