हि मा च ल डा य री (Repost - 2)



कालचा प्रवास वगळून आजबद्दल लिहन खरच अशक्य आहे. कारण कालचा प्रवास माझ्या आयुष्यातील एक यादगार प्रवास होता. चंदिगढ हुन आम्ही साधारण 7.30 innova ने निघालो.. सोबत होती पक्की हिमाचल ची (अवली) कार्टी. आम्ही तिघे आणि ते तिघे ड्राइवर सोनू, सनी आणि अजून एक कार्यकर्ता. गाडीत लावलेली 'इकडची' गाणी..त्यांची 'इकडची' हिंदी.. आणि त्या हिंदीत झालेल्या गप्पा..निव्वळ भन्नाट. खरतर त्यांच्या प्रत्येक दोन वाक्यांमध्ये कमीत कमी एक झणझणीत शिवी असायची.. पण त्या भाषेच्या लहेजामध्ये ती शिवी हि ओवी वाटायची. चंदीगड हुन निघाल्यापासून ते "मंडी" पोहचेपर्यंत धमाल आली. गपांसोबतच त्यांनी आम्हाला वाटेत लागणारी गावं, नद्या यांची व्यवस्थित माहिती दिली. हिमाचल मध्ये "फक्त प्रवास" करणं म्हणजे सुद्धा एक adventure आहे. कारण रस्त्यामध्ये इतकी वळणं आहेत, इतकी वळणं आहेत कि काही वेळानन्तर गरगरायला होतं. पण मजा आली. वाटेत एका ढाब्यावर अतिशय रुचकर आणि दणकट जेवण केलं, तोंडातून अक्षरशह प्रत्येक घासला "वाह.." येत होतं. जेवल्यावर सहज हात धुण्यासाठी म्हणून ढाब्याच्या मागे गेलो तर... मागे प्रचंड दरी आणि पहाडांचा नजारा होता. अंधारात काही स्पष्ट दिसत नसलं तरी त्या पाहाडांवर फिरणारे ट्रक्स, आणि त्यांच्या lights मुळे अक्षरश: डोंगरावर चांदणं फिरत असल्यासारखं वाटत होतं. निव्वळ अफलातून..!

पुढे 'मंडी'ला पोहचलो तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. आणि बाहेर "प्रचंडच" थंडी होती. आम्ही रस्त्यावरच बॅग उघडून जमेल ते जाड कपडे अंगावर चढवले आणि रात्री 2.30 ला मंडी हुन कुल्लू ला जाणारी बस पकडली. खूप झोप येत होती, शरीर थकलं होत पण डोळे मात्र जे जे दिसेल ते सारं टिपून घेण्याची धडपड करीत होते. अखेर रात्री 3ला आम्ही "औट" युथ हॉस्टेल बेसकॅम्प ला पोहचलो. आणि स्वतःला झोपेच्या हवाली केलं.
सकाळी उठून रूम बाहेर आलो तेव्हा बाहेरचा नजारा पाहून थक्क झालो. कारण, रूम च्या चारही बाजूला उंचच उंच पहाड होते, आणि पाठीमागे "बियास" नदी अगदी शांतपणे वाहत होती. वाह..! खरं सांगायचं तर "बियास" ला बघताक्षणी तिच्या प्रेमात पडलो. बियास इतकी सुंदर, शांत आणि देखणी नदी मी आजवर पहिली नाहीये. अप्रतिम्म..!



त्यांनतर सकाळी सकाळी एक छोटा walk केला, (करवत नसतानाही)व्यायाम केला. आणि नन्तर मजबूत नाश्ता केला (छोले भटुरे आणि खीर). इथलं सगळंच जेवण अक्षरश: बोट चाटायला लावणारं आहे (आणि मुख्य म्हणजे unlimited आहे..!!). पुढे थोड्याश्या आरामाची आणि अंघोळीची अपेक्षा होती. पण या दोनही गोष्टी या ट्रेक मध्ये निव्वळ "अंधश्रद्धा" आहेत. नाश्ता केल्या केल्या पुढचा प्लॅन होता एक छोटा ट्रेक. साधारण 2 तास डोंगर चढल्यावर जवळच असलेल्या "नाव" नावाच्या गावात आम्ही पोहचलो. (आणि मजबूत केलेला नाश्ता जिरवला). पण प्रत्येक क्षण, प्रत्येक नजारा अफलातूनच होता त्यात काही वाद नाही. टॉप ला गेल्यावर जेव्हा दूर बर्फाळ शिखरं दिसली तेव्हा अक्षरश: भरून पावलो. अखेर 'हिम'आ दर्शन झालंच.
ट्रेक दरम्यान बाकी मित्रांशी ओळखीही झाल्या, आमच्या सोबत सध्या केरळ, दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, पुणे इथली मंडळी आहेत. आमच्यासोबत ''भारत" आहे.


ट्रेक छोटा असला तरी बऱ्यापैकी पाय दुखवणारा होता. परत हॉस्टेल ला आल्यावर सरळ पाठ जमिनीला टेकवून झोपवस वाटतं होतं.. आणि तसा एक प्रयत्न हि केला. पण लगेचच पुढचा प्लॅन रेडी होता. जेवून संध्याकाळी एक छोटी test सायकल ride to 'बनला' villege. मग काय सायकल म्हटल्यावर थकवा , झोप सारं क्षणात पळालं. कारण त्यासाठीच तर केला आहे हा सारा अट्टहास. प्रत्यक्ष सायकल हातात देण्याआधी एक अतिशय महत्वाच session झालं. ज्यात सायकलिंग बद्दल, गिअर्स बद्दल, इथल्या roads बद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. आणि शेवटी सायकलही मिळाली.


सायकल वर बसून पेडल करताना मला तर अक्षरश: गुदगुल्या होत होत्या. कारण, finally my dream came true.. cycling in Himachal..!! एकाबाजूला उंचच उंच पहाड , दुसऱ्याबाजूला नितांत सुंदर 'बियास' आणि मधून सायकल चालवणारा मी..!! स्वप्नवत आहे सगळंच.

- आनंद
28/04/2018



Click on the link below and enjoy 1st part o Himachal Diary (Repost 1)

https://www.firasti.in/2019/09/Himachaldiaryrepost-1.html

Comments

Post a Comment

Popular Posts