हि मा च ल डा य री (Repost - 3)



खर एका ट्रेक मध्ये कित्ती कित्ती गमती जमती असतात राव ? म्हणजे मी जरी इथं सायकलिंग साठी आलो असलो तरी सायकलिंग सोबत इथं बरंच बरच काही अनुभवतोय. आजचा दिवस असाच अतिशय समृद्ध करणारा होता. सकाळी साधारण 9ला आम्ही सायकल आणि packed जेवणासहित बेसकॅम्प सोडलं. आपलं आपलं सामान सायकल ला बांधल असल्यामुळे भारी सायकल खरच "भारी" झाली होती. मनात एक विश्वास होता की काही झालं, कितीही चढ आले तरी हातात सायकल घेऊन चालण्याची वेळ माझ्यावर नाही येणार. त्याच आत्मविश्वासात सायकल ला पहिलं पेडल मारलं. पूर्ण सायकलिंग चा रस्ता खरच interesting होता. हिमचलच्या गावागावातून जाणारा, वेगवेगळ्या पुलांवरून पास होणारा, कुठे पक्का कुठे कच्चा, कुठे एकदम वळणदार उताराचा तर कुठे दमवणारा चढाचा पण मजा येत होती. इथली लहान मुलं खरच खूप गोड आहेत.. म्हणजे प्रत्येक गावातून सायकल वर पास होताना ती मुलं घराच्या खिडकीत/दारात येऊन गोड smile द्यायची आणि हात हलवून बाय म्हणायची. आणि अश्या निरागस स्वागताने सायकलिंग चा सारा शीण पळून जायचा.

आज औट सोडताना एका गोष्टीची मनात धाकधुक वाटत होती, ती म्हणजे औटला बाय करता करता मला ''बियास" ला ही बाय करावं लागतंय कि काय ? कारण बियास ला बाय करणं खरच माझ्या जीवावर आलं होतं. पण आम्ही जस जस पुढं जाऊ लगलो तशी बियास ही आमच्या सोबतच येत होती. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्ण दिवसाच्या प्रवासात 'बियास' आमच्यासोबतच आहे. (अजूनही).

आज दुपारी साधारण 3ला आम्ही 'फागोपुल कॅम्प' ला आलो. फागोपुल कॅम्प म्हणजे खरा खुरा जंगलातला कॅम्प आहे. इथं आमची व्यवस्था टेंट मध्ये केली आहे. आसपास कुठलंही गाव किंवा शहर नाहीये. आहेत फक्त दोन गोष्टी
1. हिरवागार उंच डोंगर आणि
2. बियास.
आज दुपारी आल्या आल्या आम्ही सायकली ठेवून थेट बियास गाठली. औट ची शांत बियास इथं मात्र थोड खोडकर आहे. भल्यामोठ्या पात्रात अगदी खळखळत आपल्याच तालात पुढे जाणारी काही अल्लड पण नितांत सुंदर. खरतर बियास ला फक्त भेटून परतुयात असा विचार होता, पण मग नदीला भेटणं म्हणजे काय बरं ?
तर.. थेट अंघोळ..!!
पाणी प्रचंड प्रचंड प्रचंडच थंड होतं. त्यामुळे आधी फक्त पाय, मग गुडघ्यापर्यंत पाणी, मग कमरे पर्यंत आणि शेवटी मग थरथरत ओम नमः शिवाय..! कुडकुडत थरथरत का असेना पण finally आम्ही अंघोळ केली (ठाणं सोडल्यापासून पहिल्यांदाच) आणि ती ही बियास मध्ये ! मज्जा आवि गायो..!
थंडगार पाण्यात बराच वेळ निवांत आणि मनसोक्त डुंबलो.


परत कॅम्पसाइट वर आलो तेव्हा गरमा गरम पकोडे आणि सूप रेडी होतं. (तेही unlimited). मग काय.. पकोडे आणि सूप सोबत टेंट मध्ये दमशेराज ची बेफाम मैफिल जमली आणि धम्माल आली. आता खरच पूर्ण टीम एक झाली आहे. धमाल, मस्ती, काळजी, चौकशी, फोटो, गप्पा, गाणी, सायकलिंग, अंघोळ.. असं खूप काही एकत्र करणारी टीम.
आताही एका कानाजवळ बियास ची खळखळ आहे तर दुसऱ्या कानाजवळ पॉल च घोरणं (टीम..!! ;-).

- आनंद
29.04.2019

To read Day 2 & day 1 click on link below :

https://www.firasti.in/2019/09/Himachaldiaryrepost-1.html

https://www.firasti.in/2019/10/Himachaldiaryrepost-2.html







Comments

Popular Posts