हि मा च ल डा य री (Repost - 1)



कॅलेंडर वरच्या रकन्यांमध्ये जर सापशिडी सारखी शिडी असती तर... ? असती तर.. 2 तारखेवरूनच मी शिडी चढून 26 तारीख गाठली असती.. आणि हा आजचा प्रवास सुरु केला असता... पण हरकत नाही.. पंचवीस स्पीड-ब्रेकर्स ओलांडून झाल्यावर अखेर आजचा दिवस आलाच. i.e. 26 एप्रिल, 2018.

सुरवातील रेल्वे वाले मी खरंच इतका लांब प्रवास करणार आहे याबाबद्दल 'confirm' नव्हते, पण मग मी "ये तो च्च" आहे म्हटल्यावर त्यांनी ऐनवेळी कशीबशी RAC मध्ये जागा करून दिली आणि प्रवासाला सुरुवात झाली.
खरतर सकाळी आठला घरचे आणि घर, 9ला ठाणेकर आणि ठाणे, आणि 12 ला मुंबईकर आणि मुंबई (वडापावसाहित) सोडली होती. पण तरीही हे सारं सोबत कुठेतरी होतंच.

खरच एकटा प्रवास करता येईल का कधी मला (माणसाला) ? माहित नाही..
कारण जरी मी आपली माणसं, आपला प्रदेश सोडून दूर चाललो असलो तरी, "तिकडे दूर" जाताना प्रवासात जागोजाग भेटणारी माणसं नकळत "आपली" होतंच आहेत की.. त्यामुळे "एकट्याने प्रवास" मला तरी खरच शक्य दिसत नाहीये. आजही "पश्चिम एक्सप्रेस" मध्ये बरीच माणसं भेटली... (हो "माणसचं" गर्दी नव्हे).
महाराष्ट्र मागे गेल्यावर गाडी गुजरात मध्ये शिरली. आणि एक बंगाली दादा भेटला.. अतिशय गप्पाळू आणि रसिक.. तो खरा होता बंगालचा कामानिमित्त राहत होता गुजरात ला पण त्याला जवळ जवळ 6 भाषा येत होत्या.. आणि मराठी ही समजत होती. त्यात त्याला चित्रपटांबद्दल विशेष रुची होती.. त्याने नटसम्राट पाहिलेला होता (थिएटर मध्ये).. मग काय आधी गप्पा, मग कविता, मग एकत्र जेवण.. असं बरंच काही... मजा आचे


या पुढे गुजरातमध्येच अतिशय चलाखीने गोड गोड बोलून इंच इंच सीट बळकावणारे दोन-तीन नमुने भेटले.... उगाचच मोठमोठ्याने (संसदेत असल्यासारखं) भांडणाऱ्या 2-3 बायका भेटल्या...  ट्रेन च्या एकाच डब्यात रेग्युलर up-down करणारी आगाऊ छोटी कार्टी भेटली... आणि प्रवास... खास झाला... रात्री साधारण 2-3 ला जेव्हा जाग आली... तेव्हा ट्रेन संथ लयीत धावत होती... बाहेर निळसर अंधार होता.. आभाळात (आणि मनात) चांदणं होतं.. सहज गाणी लावली तर गजल लागली... आणि मग... "वाह..क्या बात है..!"आधी जगजीत सिंग, मग हरिहरन.. काही गाण्यांतच मुड पार 'सातवे असमानपर' गेला.

दुसऱ्यादिवसाची पहाट अशी अगदी डोळ्यांसमोरच झाली. कारण, काही केल्या रात्रीत मजबूत झोप काही आलीच नाही.
खरतरं, 'चालू असलेला प्रवास.. त्यात मिळालेली window seat.. त्यातून जवळजवळ दर तासाला बदलणारी राज्य... हे सारं सोडून गाढ झोपावं' असं बिचाऱ्या झोपेलाही वाटलं नसावं. बराच वेळ नुसताच बसून होतो. 'असच.. ' "सकाळ झाली आहे, आता उठून ब्रश करावं, फ्रेश व्हावं" असं मनापासून वाटत नव्हतं.. (खरतर, फ्रेश व्हायला अळसावलोच कुठं होतो ?) पण तरी साधारण 9 ला पोटाने बराच हट्ट केल्यावर ब्रश केला आणि बॅगेतलं मिळेल ते खादाडलं. पोटाचे नखरे पाहून मग डोळेही कुरकुर करू लागले. कारण खिडकीतून येणारी वाऱ्याची भिरभिर अगदी बेफाम होती, त्यामुळे पापण्यांची नुसती फडफड होत होती आणि बिचाऱ्या डोळ्यांना त्याचा ताप होतं होता....
मग मस्त अपर सीट मिळवली आणि ताणून दिली. बिनधास्त आणि बेफिकरपणे (कारण बॅग सांभाळायला निखिल होताच).

दुपारी डोळे उघडले तेव्हा दिल्ली आलं होतं.. पण स्टेशन पाहून आपण खरंच असं राजधानीत वगैरे आलो आहोत असं वाटत नव्हतं. कारण मला तरी दिल्ली आपल्या कल्याण डोंबिवली सारखंच वाटलं. दुपारी 12 ला आम्हाला पश्चिम एक्सप्रेस मध्ये 24तास पूर्ण झाले पण कंटाळा वगैरे काही आला नव्हता. आता हा प्रवासच हवाहवासा वाटत होता. असं वाटत होत अजून 2-3 दिवस असच भटकावं.. पण चंदिगढ आल्यावर finally आम्ही सदेह गाडीबाहेर अवतरलो.
स्टेशन बाहेर पडताच आम्हाला टॅक्सी, रिक्षा, बसेस वाल्या जमातीच्या प्रचंड आग्रह cum त्रासाला सामोरं जावं लागलं. कितीही नको नको म्हटलं तरी मागं मागं फिरणाऱ्या रिक्षा वाल्यानी डोकं आऊट केलं होतं. पण नन्तर मात्र एकेकाला झापत झापत त्यातून सुटका करून घेतली. आणि चंदीगड ट्रान्सपोर्ट ची ac बस पकडून "सेक्टर43" बस स्टॉप गाठलं.

पुढचा प्रवास होता - 'चंदिगढ ते कुल्लू' चा..
पण बसेसच वेळापत्रक, तिथली गर्दी बरच काही अनाकलनीय होतं. त्यातच 'युथ हॉस्टेल बेस कॅम्पहुन बदलेलं वेळापत्रक कळलं होतं. त्यानुसार तिथं लवकर पोहचण गरजेचं होतं. मग शेवटी 7ला एक प्रायव्हेट इनोव्हा पकडून पुढचा प्रवास सुरु केला. सोबत काही मजेदार हरियांवि मित्र होते.. "उंकी बाते, किस्से वडडे अजीब से.. पर मजा आ या"
प्रवासात गाडीत मस्त हरियांवि गाणी सुरु होती.. गाडीने नुकतीच हिमाचल मध्ये एन्ट्री केली होती.. साधा सरळ रस्ता गिरक्या घेऊ लागला होता..
कदाचित, हि मा च ल आम्हाला बोलवू लागला होता.....

- आनंद
२७.०४.२०१८

Comments

  1. It was very awesome trip bro
    I am missing all the adventures

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts