हि मा च ल डा य री (Repost - 4)

फागोपुल सोडण्या आधी पुढच्या रूट बद्दल बरच काही कानावर आलं होतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी निघण्याधी थोडं टेन्शन आलंच होतं. हे टेन्शन घालवण्यासाठी कॅम्प लीडर वेळोवेळी सूचना देत होता, "don't look in to the kilometres & altitude, just focus on the pedal".
सकाळी 9 ला आम्ही फागोपुल सोडलं..
मूड आणि वातावरण दोन्ही प्रसन्न होतं त्यामुळे सायकलिंग ला मजा येईल असं वाटत होत. पण जी काही मजा आली ती वेगळीच होती. कारण फागोपुल सोडल्यापासून फक्त आणि फक्त uphill चढच चढ होते. प्रत्येक पेडल खूप 'भारी' वाटत होता. पण तरीही जमेल तसं आणि सायकल वरून खाली न उतरता पेडलिंग सुरूच होतं. गियर्स तर पूर्ण 0 ला उतरवले होते. पण 0 गियर्स वरही पेडलिंग जीव काढत होतं. त्यात असणारा रस्ता..."ओह माय गॉड" आज सुरुवातीच्या रस्त्यावर 1 -2 मार्केटस होते. पण तेही प्रचंड अश्या चढणीवर.. त्यात 'बंजार' मार्केटमध्ये तर गर्दी आणि चढणीमुळे प्रत्येकाची दणदणीत वाट लागली होती. पण तरीही प्रत्येक जण त्याला जमेल तसं स्वतःला push करत होता...
या अतिशय दमवणाऱ्या चढणीमुळे ग्रुप मधील दोन जण आजारी पडले.. त्यांना टेम्पोने पुढच्या कॅम्प ला पाठवलं गेलं. बाकीचे स्वतःला अक्षरश खेचत होते. त्यात काही जणांच्या सायकली आजारी पडल्या, त्यामुळे ते मागे थांबले. 20 पैकी 10 जण फक्त इंच इंच पुढे सरकत होते. त्यात मीही होतोच. पण मग या न संपणाऱ्या चढांपुढे माझ्याही सायकल ने कुरकुर चालू केली. मागचे गियर्स खूप त्रास देऊ लागले. तरीही मी जमेल तसं पेडलिंग करीतच होतो. पुढे "जलोरी पास" संपवून खाली येणारा ग्रुप रस्त्यात भेटला. थोडं hi hello झाल्यावर मी माझा problem त्यांना सांगितला आणि सुदैवाने त्यातल्या एक अतिशय चांगली सायकल मला मिळाली. आणि मी हुश्श केलं.
आता नवीन सायकल मिळाल्यामुळे मला चांगलाच कॉन्फिडन्स आला होता. मी 0 गियर्स वर का असेना पण बऱ्यापैकी push करत होती. रस्ता इतका uphill आणि वळणावळणाचा होता की साधा एक छोटासा उतार पाहायलाही मिळत नव्हता. फक्त आणि फक्त climb... thats it..!! त्यातच मग बियास सुद्धा दिसेनाशी झाली होती. त्यामुळे खरच सायकल चालवणं जीवावर आलं होतं. प्रत्येक वळणाला आम्हाला असं वाटायचं की आता खूप चढलो पुढे नक्की उतार असेल. पण रस्ता मात्र गिरकी घेऊन परत वर चढायचा. आज पूर्ण दिवसभरात एकही चांगला उतार आमच्या नशिबात नव्हता. तस पाहता 'फागोपुल ते जिभी' हे अंतर *फक्त 14km* आहे. पण हे 14km फक्त आणि फक्त चढणीची आहेत. आणि हिमाचल मधले चढ म्हणजे.."बाप रे बाप".
शेवटी हळू हळू करत साधारण आम्ही 4ला जिभी ला पोहचलो. सकाळी 9 ते दुपारी 4. सात तास खतरनाक प्रवास.
इथं आल्यावर फक्त जमिनीला पाठ टेकवून पडायचीच इच्छा होती. पण फक्त पडणं आम्हाला काही पटत नव्हतं. आम्ही जवळच असलेल्या धबधब्यासाठी एक छोटा ट्रेक केला. पण जेव्हा तिथं पोचलो तेव्हा भरून पावलो. कारण खरंच जर स्वर्ग नावाची जागा कुठे असेल तर ती अगदी अशीच असेल. दोन्ही बाजूने उंच डोंगर, आतून जाणारी अतिशय सुंदर वाट त्यातून वाहणारे ओहळ.. अतिशय उंच झाडी.. अधून मधून गवत आणि नाजूक वळणं. सारा शीण खरतर तिथेच पळाला. पुढे पोचल्यावर मिळालेला धबधबा म्हणजे निव्वळ अप्रतिम. पण त्यातलं पाणी म्हणजे बर्फाच दुसरं रूप. प्रचंड प्रचंड प्रचंडच थंड. इतकं कि फक्त पायाचा तळवा पाण्यात टाकल्यावर काही सेकंदांन्तर तो सुन्न पडायाचा. काही क्षण विचार केला आणि मग शिरलो आत.
पटकन आत जाऊन 2-3मिनिटात झपकन बाहेर आलो. अंग पूर्ण ओलं झालं होतं, थरथरत होतं पण अतिशय फ्रेश वाटत होत. फागोपुल ते जिभीचा सगळा त्रास, थकवा त्या 3 मिनिटात वाहून गेला होता. तिथून कॅम्पसाईट वर येताना अतिशय हलकं वाटत होतं.
आज 14 km मध्ये 1 ते 2 दा विचार आला की, "यार आता हे बस्स.. आता अजून सायकल नको" पण खरतरं त्या सायकल मुळेच आज मी इथे आहे.
ही देवभूमी हिमाचल, असा अतिशय सुंदर ग्रुप हा मला फक्त आणि फक्त सायकल मुळेच मिळाला आहे. म्हणून आजचा दिवस माझ्या दोन चाकाच्या परील समर्पित..!! Thanks buddy..!!! Thanks for making me adventures and live..!!
- आनंद
30/04/2018
Click on the link below to read previous diaries :
https://www.firasti.in/2019/10/Himachaldiaryrepost-2.html
#keepreading #keeptraveling
Comments
Post a Comment