बावरा मन...
"बावरा मन देखने चला एक सपना..."
एक अप्रतिम, अर्थपूर्ण आणि माझं प्रचंडच आवडतं गाणं. गाण्याचे शब्द आणि आवाज आहे गीतकार स्वानंद किरकिरे यांचा. आज बऱ्याच दिवसांनी हे गाणं ऐकण्यात आलं आणि या गाण्याशी गुंफलेली एक अवीट आठवण जागी झाली.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना नुकतंच "प्रेमात" पडलो होतो. "ती"च्या सोबत भटकताना, प्रत्येक क्षण भरभरून जगताना दिवस कसे जात होते तेच कळत नव्हतं. एकूण काय आमचं प्रेम ऐन भरात होतं. आणि त्याचदरम्यान कॉलेजकडून एक भन्नाट संधी चालून आली. ''कोकण सायकल ट्रेक'' - 'ठाणे ते दापोली' असा साधारण पाच दिवसाचा सायकलिंग दौरा. बातमी ऐकल्यापासूनच मी (आणि तीसुद्धा)अगदी हवेत गेलो होतो. तिच्या केसांत माळलेली घंटी तर नुस्ती 'ट्रिंग ट्रिंग' करीत होती. आणि मी हि या दौऱ्याच्या तयारीला लागलो होतो. माझी कितीही तयारी (हौस) असली तरी त्याला घरून अर्थातच निर्मळ विरोध होता. आणि त्या विरोधाला (अर्थातच) माझा विरोध होता.
आणि अखेर माझ्या 'असहकार चळवळी'पुढे घरच्यांचं काही चाललं नाही. आणि मला आणि 'ती'लाही ट्रेक ची संमती मिळाली.
"ट्रिंग ट्रिंग...!!" :-)
आणि अखेर माझ्या 'असहकार चळवळी'पुढे घरच्यांचं काही चाललं नाही. आणि मला आणि 'ती'लाही ट्रेक ची संमती मिळाली.
"ट्रिंग ट्रिंग...!!" :-)
साधारण 2011 च्या डिसेंम्बर मध्ये हा सायकल दौरा होता. मी प्रचंड उत्साहात होतो. पण कॉलेजची बाकीच्या मंडळीला या सायकल ट्रेक च काही घेणं देणं नव्हतं. "सायकल ट्रेक" बद्दल पहिली मिटिंग झाली तेव्हा एकूण उपस्थिती होती ३ प्राचार्य आणि १ विद्यार्थी. सायकल दौरा रद्द करावा लागणार साधारण अशीच परिस्थिती होती. पण इकडून तिकडून बराच प्रयत्न केल्यावर कॉलेज मधून मी व अजून १ आणि कॉलेज बाहेरून २ असे चार महाभाग तयार झाले. आता चार जण म्हणजे काही खूप मोठा आकडा नव्हे. पण आमच्या उत्साहामुळे आणि प्रचार्यांच्या खंबीर साथीमुळे दौरा done झाला. दौऱ्याचा मार्ग होता ''ठाणे - अलिबाग - मुरुड - श्रीवर्धन - केळशी - दापोली ". एकूण २५० ते ३०० km सायकलिंग होतं. आणि सोबत होत अर्थातच "कोकण अनुभवणं".
माझा हा पहिला वाहिला Cycling cum Traveling cum Konkan दौरा होता. प्रत्येक दिवशी आम्ही साधारण ६० ते ७० किमी सायकलिंग करत होतो. पण त्याहीपेक्षा जास्त प्रत्येक क्षण जगायला शिकत होतो. कोकणातली गच्च हिरवळ, अधून मधून भेटणारे घाटरस्ते आणि मधूनच surprise देणारा अथांग समुद्र..!! सारच कसं स्वनातीत होतं. (अजूनही आहे.. कारण तो सारा प्रवास आजही मला एखाद्या स्वप्नासारखाच वाटतो.. असं स्वप्न ज्याने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला). दौऱ्याचा शेवटचा मुक्काम 'केळशी'मधल्या एका खानावळीत होता. तिथे पोहचलो तेव्हा साधारण बाहेर अंधार पडला होता आणि प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे गेल्या गेल्या पोटभर जेवण केलं आणि मग शतपावलीसाठी बाहेर पडलो. खानावळीला लागूनच समुद्र होता.(..!!!!)
किनाऱ्यावर पोचलो तेव्हा समोर होता चांदण्यांनी तुडुंब भरलेला अंधार, अंधारातही लयीत धावणारा वारा आणि त्या वाऱ्यात आपल्याच नादात गुणगुणनारा समुद्र..!! काही क्षण कुणी काहीच बोललं नाही.. काहीतरी विलक्षण शब्दांपल्याडच अनुभवत होतो आम्ही सारे..!! त्यांनतर धीम्या आवाजात एक गाणं कानावर पडलं (आणि अलगद मनात उतरलं)...
"बावरा मन देखने चला एक सपना
बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशियाँ,
थरथराती लौ हो मद्धम, बावरी मदहोशियाँ,
बावरा एक घुंघटा चाहे, हौले हौले बिन बताये,
बावरे से मुखड़े से सरकना,
बावरा मन देखने चला एक सपना...
एखादं गाणं अनुभवणं काय असतं हे त्याक्षणी आम्हाला कळलं.. लिहलेल्या गाण्याचा अर्थ किंवा चित्रपटातला संदर्भ कदाचित वेगळा असेलही. पण मला वाटत जेव्हा एखादं गाणं अश्या अगदी खास वेळी घट्ट मिठी मारत न्..तेव्हा ते गाणं कुठल्याही चित्रपटाचं नसतं.. कुठल्याही गीतकाराच नसतं तर आपलं असतं.
गाण्याच्या पुढ्याच्या ओळी तर मला आणि माझ्या पहिल्या प्रेमाला (सायकलला) फारच जवळ आणणाऱ्या होत्या.
"बावरे से इस जहां मैं, बावरा एक साथ हो,
इस सयानी भीड़ मैं, बस हाथों में तेरा हाथ हो,
बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो,
बावरे से पैर चाहें...
बावरें तरानों के...
बावरे से बोल पे थिरकना,
बावरा मन देखने चला एक सपना . . . .
"बावरे से इस जहां मैं, बावरा एक साथ हो,
इस सयानी भीड़ मैं, बस हाथों में तेरा हाथ हो,
बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो,
बावरे से पैर चाहें...
बावरें तरानों के...
बावरे से बोल पे थिरकना,
बावरा मन देखने चला एक सपना . . . .
आजच्या भाषेत सांगायचं तर 'कोकण सायकल ट्रेक'हि माझी माझ्या पहिल्या प्रेमाची पहिली "डेट" होती. पण त्यांनतर मात्र 'ते प्रेम' आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलं आणि कधीतरी घडणाऱ्या "डेट"ची "डायरी" झाली..
Super
ReplyDeleteVery nice brother
ReplyDeleteएकदम मस्त आनंद. बावरा मन उत्तम काव्य तर आहेच पण कवीने स्वतः गायल्यामुळे त्याच्या सच्च्या भावना कुठल्याही गायकांपेक्षा प्रभावी उतरल्या आहेत. मस्त शब्दांकन. लिखते रहो दोस्त
ReplyDeleteThank You sir..
Delete💞Bawara Mann Cycle ke Sang💞
ReplyDelete:-)
Deleteप्रेम करण्यास कुण्या एका "बोलक्या" व्यक्तीची गरजच असते अस नाही, तर एखाद्या वस्तूला ही जर आर्जव केले तर स्पर्शा च्या भाषेने सुध्धा प्रेम करता येते....हेच तुझ्या आणि सायकल च्या प्रेम रंगातून दिसून येते..... अप्रतिम लेखन
ReplyDeleteTu he sagale japoon thev , preyasee sakat
ReplyDeleteJaroor.. ☺️
DeleteWe are planning for same Kokan Cycle Trip in Diwali vacation.....And after reading ur dairy i can't wait for it!!!!
ReplyDelete"We" means ?
DeleteI would love to do this cycling expedition again..