स्वप्न डायरी..?!! Dream Diary..?!!


सूर्य... उजेड..
उजेड... दिवस..
दिवस... रात्र..
रात्र... झोप..
झोप... अंधार..
अंधार... स्वप्न..
स्वप्न. . .

. . .स्वप्न
बऱ्याचदा खूप बोलकी असतात..
बऱ्याचदा असतात मुकी..
बऱ्याचदा असतात अर्थपूर्ण..
बऱ्याचदा.. निष्पर्ण.. सुकी..

कशीही असली तरी
त्यात असतो एक प्रवास..
कितीही गूढ असला तरी
हवाहवासा असतो.. त्यांचा सहवास..

तसं पाहता स्वप्नांवर बोलायला किंवा लिहायला मी काही मानसशास्त्रज्ञ नाही.. आणि मानसशास्त्रज्ञ होण्याचा मानसही नाही..
पण मला स्वप्न पडतात.. (बऱ्याचदा धडपडतात..)
आणि ही स्वप्न सगळ्याच प्रकारची असतात.. अगदी नवरसयुक्त..!!
कधी.. त्यात उल्हासित करणारा हवाहवासा शृंगाररस असतो,
तर कधी शिसारी आणणारा बिभीत्सपणा.. कधी गुदगुदी करणारा हास्यरस असतो,
तर कधी रौद्र आणि भयानपणा..
कधी कधी त्यात मन पिळवटून टाकणारं कारुण्य असतं..
तर कधी असतं अनामिक वीरत्व....
पण काही हि असलं.. तरी प्रत्येक स्वप्न अद्भुत असतं..
आणि मला पडणार माझं आवडतं स्वप्न असंच अद्भुत आहे आणि अद्भुत शांत आहे..

आतापर्यंत कितीतरी स्वप्न पहिली आहेत, त्यातली कितीतरी विरून गेली आहेत..
पण एक स्वप्न मात्र नेहमीच जागं असतं,
जिथं जावं तिथं माझ्या मागं असतं..
पूर्ण होईल कधी कि नाही ? माहित नाही,
पण मी मात्र ते पाहणं थांबवणार नाही..

त्यात आहे एक रात्र.. गडद गाळ काळी,
एक आहे अद्भुत शांतता.. खोलवर आभाळी..
चहूकडे समुद्र आहे..अथांग..निश्चल..शांत,
एकटा नाहीये मी.. पण आहे गूढ एकांत..
समुद्र.. लाटा.. वारा.. स्थिर आहे पसारा,
अंधारात पुसून गेलाय दूर तो किनारा..

एकांडी नाव आहे.. एकटा आहे मी,
समोर आहे चंद्र आणि काळी रात्र ती..
इवल्याश्या नावेत मी.. आहे स्थिर स्तब्ध,
शांतता विरघळून मौन, झाले आहेत शब्द..
गच्च गच्च चांदणं होत चाललंय विरळ,
गूढ प्रचंड चंद्रबिंब हळूहळू येतंय जवळ..

चंद्र, चांदणं, समुद्र, लाटा, नाव
सारं सारं थेट अंगावर येतं,
जेव्हा शब्द होतात ठार मुके
तेव्हा..
आपसूक स्वप्न कागदावर येतं..

कागद.. स्वप्न..
स्वप्न.. अंधार..
अंधार.. झोप..
झोप.. रात्र..
रात्र.. दिवस..
दिवस.. उजेड
उजेड.. सूर्य..
सूर्य.. सकाळ..
सुंदर सकाळ..!!


Dream is never ending firasti..

Tag cloud
Firasti
Dream firasti
Dream Diary
Marathi Gypsy
Dreamer gypsy
सुंदर सकाळ..!!

Comments

  1. खूपच छान सुचलंय आणि लिहिलं आहेस, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल असं काहीतरी !

    ReplyDelete
  2. Mr. firasti, Tuzi sagli swapn complete houdet....
    Ashich swapn baghat raha and complete karat raha

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts