मैसूर डायरी (Day - 6 शेवटचा) Mysore Diary

आज का कुणास ठाऊक अंथरुणातून उठवसच वाटत नव्हतं. एखाद्या हट्टी लहान मुलासारखं पडून राहावं तसं नुसतं पडून राहावंसं वाटत होतं.. ना फिरावसं वाटत होतं, ना मैसूर मधून निघावस वाटत होतं..
पण निघणं तर भाग होतं..
आणि निघण्यासाठी उठणं भाग होत..
अखेर साधारण 9 वाजता मी शहाण्यामुलासारखं सारं आवरलं आणि Youth Hostel Mysore मधून chek-out केलं. परतीची बस संध्याकाळी 5.30pm होती, त्यामुळे तस पाहता माझ्याकडे बराच वेळ होता. पण, हॉस्टेल बाहेर आलो तेव्हा  डोकं चकचकीत blank होतं.. काय करायचं ? कुठे जायचं ? काही काही ठाऊक नव्हतं. असच बोलता बोलता कळलं मैसूर मधलं zoo खूप छान आहे. मग काय थेट.. Zooo...
विचार केला होता साधारण तास दोनतास zoo फिरून दुसरं काहीतरी पाहावं. पण एकदा झू मध्ये गेल्यावर वेळ कसा गेला कळलंच नाही. जवळ जवळ 4 ते 5 तास अगदी रंगुन गेलो. आणि मैसूर zoo खरच इतकं अप्रतिम आहे. त्यात फिरता फिरता तुम्ही कधी लहान होऊन जाता कळतंच नाही. Zoo म्हणजे खरंच गंमत आहे. त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी.. पोपट, मोर, गरुड, वगैरे आणि प्राणी.. वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, माणूस  वगैरे मस्तच. एकदम रमून जायला होतं. त्यात आज गेल्या 7 दिवसांत पहिल्यांदा थेट, live मराठी आवाज ऐकला, मराठी माणूस पहिला (zoo मध्ये). Zoo मध्ये बरीच मराठी कुटुंब मी ऐकली आणि पहिली. गम्मत वाटली..!!

Zoo मध्ये जवळ जवळ चार पाच तास घालवल्यावर मात्र प्रचंड भूक लागली होती. मग जवळच एका हॉटेलमध्ये दाबून जेवण केलं. (या मैसूर दौऱ्यातल शेवटच जेवण - मैसूर मसाला डोसा..!!) आणि परतीची बस गाठली.
आता बस मध्ये आहे... आणि मागे पळणाऱ्या झाडांसोबत मैसूर ने दिलेल्या आठवणी भरभर डोळ्यांसमोरून सरकत आहेत.. युथ हॉस्टेल.. सायकल.. मैसूर.. डोसा.. पाक.. पॅलेस.. वरुणा.. पाणी.. चामुंडी.. आणि बरच काही.. आणि खूप काही..

मैसूर सोडताना वाटत होतं, "शिट यार, आता तर आलो होतो आणि आता लगेच प्रवास संपला पण.."
पण.. नंतर मात्र मनातल्या मनात हसलो..
कारण, तस पाहता मैसूरचा मुक्काम संपला होता..
प्रवास तर चालूच होता..
चालूच आहे...
चालूच राहील..
कारण, "My journey is my destination..

(Diary Paused till next expedition)
Thank You for traveling with me..!!
#keepreadingKeepRoaming







Links of all Mysore Diaries -

https://www.firasti.in/2019/05/day-1.html

https://www.firasti.in/2019/05/day-2.html

https://www.firasti.in/2019/05/Mysore-diary-day-3.html

https://www.firasti.in/2019/05/Mysore-Diary-day-4.html

https://www.firasti.in/2019/05/day-5-mysore-diary.html

www.firasti.in



Tag Cloud
Marathi Firasti
Gypsy Soul
Mysore Diary
Mysore cycling expedition

Comments

  1. उत्तम शब्दांकन आणि मांडणीही तितकीच उत्कृष्ट आनंद.....
    तुझ्यासोबत केलेल्या या प्रवासाने मनातील थकवा दूर झाला बघ...
    आनंदा, तुझे खूप खूप आभार ...आणि पुढच्या फिरस्ती साठी शुभेच्छा...💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts