मै सू र डा य री (Day - 2)
मै सू र डा य री (Day - 2)
काल रात्री कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा गाडी कुठेतरी कर्नाटक मध्ये धावत होती. डोळे उघडले तेव्हा खिडकीबाहेर नारळाची झाडं मागे मागे पळत होती. शेत हिरवीगार दिसतं होती.. एकंदर मस्त वाटत होतं. आणि नेहमीसारखच प्रवास संपूच नये असं वाटत होतं. बस 8.30 मैसूर ला पोहचण अपेक्षित होतं. पण पोहचायला दुपारचे 12 वाजले. बसमध्ये खूपच अराम झाला होता.. त्यामुळे गेल्या गेल्या काहीतरी तुफानी उद्योग करावेसे वाटत होते.. पण, International Youth Hostel, Mysore ला पोहचलो तर वेगळंच surprise समोर आलं.
मी ज्या cycling program साठी इथं आलो आहे.. त्यासाठी एकूण फक्त 'एका' माणसाने booking केलं आहे. आणि तो म्हणजे मीच. मला हे कळल्यावर आधी काय बोलाव तेच कळेना. पण, मग मी त्यांना ठामपणे सांगितलं, "I booked my 8days for the program. So, i will continue with my plan.. i want perfect schedule as you mentioned in your itinerary..!". त्यांनीही हो म्हटलंय.. बघू आता काय होतंय.
आल्या आल्या फ्रेश होऊन मजबूत जेवलो आणि तास दोन तास मस्त अराम केला. मुंबईतल्या उकड्याची सवय असल्यामुळे मैसूर मधलं वातावरण फारच अल्हाददायक वाटतंय.
आल्या आल्या फ्रेश होऊन मजबूत जेवलो आणि तास दोन तास मस्त अराम केला. मुंबईतल्या उकड्याची सवय असल्यामुळे मैसूर मधलं वातावरण फारच अल्हाददायक वाटतंय.
उठल्यावर थेट सायकल ताब्यात घेतली आणि बाहेर पडलो. काय करायचं ? कुठं जायचं ? काही माहित नव्हतं. फक्त दोन गोष्टी करायच्या हे नक्की होतं.
गोष्ट नं 2 - घाम येईस्तोवर सायकल चालवायची.
गोष्ट नं 1 - रस्ता चुकेस्तोवर भटकायचं.
आणि ठरवल्यानुसार दोन्ही गोष्टी केल्या. कुठं गेलो होतो अजिबात माहित नाही.. कारण रस्त्यावरच्या बोर्ड वर काय लिहलंय तेच कळत नव्हतं. (असं वाटत होत जागेच नाव लिहण्याऐवजी मेहंदीची design काढलीय.) परत येताना बराच उलटा-पुलटा भटकलो आणि शेवटी google map चालू करून परत हॉस्टेल ला आलो. हुश्श.. छान वाटलं.
हे शहर खरच छान आहे..
पहिल्यांदा मला कुठल्याही adventure पेक्षा इथली शांतता हवी हवीशी वाटतेय. इथली घर, इथले रस्ते सारंच कसं शिस्तबद्ध आणि शांत आहेत. आता जेवण (अर्थात मजबुतच) केल्यावर बराच वेळ खाली walk करत होतो. मस्त गार वारा येत होता.. भारी वाटत होतं. आता मात्र झोपायला हवं.. कारण, उद्या सकाळी 7ला reporting आहे. कुणीतरी guide येणार आहे (फक्त) माझ्यासाठी. कारण, participant मी एकच आहे..
एक आहे पण एकटा नाहीये..
कारण, सायकल आहेच न माझ्या सोबतीला.!

Amazing....
ReplyDeleteदोघे मिळून मस्त मज्जा करा रे
ReplyDeleteKeep it up Anand :)
ReplyDeleteEk Number Anand
ReplyDeleteVery nice bro
ReplyDeleteVery nice bro
ReplyDeleteN1 bro
ReplyDeleteGreat Anand... Enjoy 👍
ReplyDeleteWa awesome
ReplyDeleteAre vaa majja ahe tuzi and tichi
ReplyDeleteKhup chhan dada..
ReplyDelete