मै सू र डा य री (Day - 1)

मै सू र   डा य री (Day - 1)
(30.04.2019)


प्रवास...

काही ही डोक्यात नसताना पासून काहीतरी डोक्यात येईपर्यंत - डोकेबाज प्रवास..
Youth Hostel चा दौरा प्लॅन केला तेव्हा पासून आजच्या दिवसापर्यंत - बैचेन करणारा प्रवास..
आणि अखेर..
आता सुरु झालेला सदेह..बसचा - खराखुरा प्रवास..!!

प्रवास कसलाही असला तरी मन प्रचंड उत्सुक असतं. आजही सकाळपासून बस मध्ये बसण्याची वाट पाहत होतो. खरतरं त्याला दोन कारण होती -
कारण नं 2 - मला 18तास sleeper बसने प्रवास करता येणार याची excitement.
कारण नं 1 - (घरी, ठाण्यात प्रचंड म्हणजे प्रचंडच गरम होत होतं, म्हणून बस मध्ये मिळणाऱ्या गार वाऱ्यासाठी उतावीळ होतो)
आणि finally..भर दुपारच्या उन्हात ४ वाजता बस मिळली आणि हुश्श झालं..

खरतरं, मैसूर प्लॅन मी खूप आधीच रद्द केला होता.. माझा खरा प्लॅन होता.. "Ooty - Western Ghats Cycling expedition".
त्यानुसार सुट्ट्यांच नियोजन झालं होतं, सगळं booking झालं होतं, सगळी तयारी सुद्धा झाली होती.. पण दोन दिवस आधी काही कारणाने युथ हॉस्टेलने तो दौरा cancel केला आणि प्लॅन फुस्स झाला. त्या आलेल्या फोनवर आधी काही क्षण माझा विश्वासच बसेना. फोननंतर10 मिनिटं मनापासून वाईटसुद्धा वाटलं.. पण 11व्या मिनिटाला मी मैसूर दौरा done केला. कारण, डोक्यात एक एकदम पक्क होतं.. ठिकाण काही हि असलं तरी मला जगायचा होता प्रवास.. वेडेपणा.. आणि करायचा होता फिरस्तीनाद..!! मग काय परत केलं सगळं नियोजन.. आणि आळवला नवा सूर मै-सूर..!

ऐनवेळी नियोजन केल्यामुळे रेल्वेवाल्यानी मला त्यांच्या सोबत नेणं नाकारलं..(no reservations). पण, बस वाल्यानी आनंदाने मला स्वीकारलं. आता बस मध्ये मिळालेली सीट 'एकदम मक्खन' आहे... मऊ मऊ गादी.. गारे गार हवा.. पूर्ण देहाला आडवं होण्यासाठी पुरेशी जागा.. आणि सगळ्यात सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच ते सहा फूट लांबीची खिडकी..!! वाह भाई वाह..!! एखाद्या फिरस्त्याला अजून ते काय हवं..? बस मध्ये बसल्यापासून एखाद्या हावरटासारखा मी खिडकीला चिकटून बसलो आहे. आधी मुंबई.. मग संपूर्ण खंडाळा.. मग पुणे.. सारं सारं अगदी वेगळ्याच angle ने डोळ्यात भरुन घेतलंय. मज्जा येतेय. त्यात कधी मोबाईल (सुरात) गाणी म्हणतोय तर कधी मी (ofcourse बेसुरी) गाणी म्हणतोय. नुस्ती जुगलबंदी..

झोपायचा मनापासून प्रयत्न चालू आहे.. पण, हि खिडकी झोपुच देत नाहीये.. आणि ती माझ्याकडे असं टक लावून बघत असताना माझी डोळे झाकायची मुळीच इच्छा नाहीये...

आनंद
11.23pm


Comments

  1. खूप मस्त एकदम भारी

    ReplyDelete
  2. Its happy to know that you found your suurr 🎶 in mysore.
    Naam mei jaadu hai Mysore.

    ReplyDelete
  3. Way to go Anand
    Large raho

    ReplyDelete
  4. Kadak ajun details madhe lihat ja

    ReplyDelete
  5. खतरनाक भाई लय भारी लिहितोस

    ReplyDelete
  6. वाह , फारच छान! तुझ्या या मै सुराला आमच्या सदिच्छेची साथ! लिहीत रहा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts