मै सू र डा य री (Day - 3)
आज सकाळी (कुठल्याही Alarm शिवाय) बरोब्बर 5.30 ला उठलो... आणि तयार होऊन 6.30 ला Canteen गाठलं. तसं पाहता निघायची कसलीही घाई नव्हती पण excitement मात्र खूप होती. त्यात गम्मत म्हणजे.. "YHAI मैसूर शाखेने आयोजित केलेला हा पहिला वहिला program आहे आणि मी त्यांचा पहिला वहिला (आणि एकुलता एक) participant..!" त्यामुळे मला इथे एकदम royal treatment मिळतेय. आज सकाळी त्यांनी चक्क माझ्या एकट्यासाठी guide cum (पट्टीचा) cyclist बोलावला होता. तो हि एक भन्नाट माणूस होता. नंतर झालेल्या गप्पांमधून कळलं, या पट्ट्याने जवळ जवळ अक्खा भारत सायकलवर पालथा घातलाय. दिवसातून फक्त चार तास काम करतो आणि बाकी वेळ फिरस्ती. भारीच...
सकाळी 7ला आम्ही हॉस्टेल सोडून रस्त्याला लागलो. आजची राईड होती "चामुंडी हिल राईड". चामुंडी हिल हा एक मैसूर शहराला लागून असलेला डोंगर आहे. आणि शहरातल्या सगळ्या cyclist जमातीचा आवडतं ठिकाण आहे. त्यामुळे मलाही आल्यापासून चामुंडी जायची उत्सुकता होतीच. सकाळ सकाळी शहरातून सायकलिंग करणं सुद्धा खूप छान अनुभव होता. कारण, मैसूर शहर खरंच सुरेख आहे.. अगदी शांत आहे..(traffic, धूर, कलकलाट रहित) आणि मुद्दा म्हणजे इथले रस्ते एकदम मख्खन आहेत. त्यामुळे सायकलिंग करताना जास्त काही कष्ट जाणवत नाहीत. सायकलिंग करताना guide सोबत कळेल त्या भाषेत जमेल तश्या गप्पा चालूच होत्या. आम्ही साधारण तासाभरातच शहरातले छोटे मोठे रस्ते, चौक पार करत करत चामुंडीचा पायथा गाठला. पायथ्याला पोहचेपर्यंत सायकलिंग मध्ये कसलेच कष्ट करावे लागले नाहीत. पण चामुंडी चा डोंगर पहिला आणि पुढे वाढून ठेवलेल्या कष्टांची स्पष्ट कल्पना आली. चामुंडी डोंगराच्या माथ्यावर पोचण्यासाठी 7 किलोमीटर चा चढ आहे. आणि तो चढ दम काढणारा आहे.
मी डोक्यात एक गोष्ट पक्की ठरवली होती की, "मागे हटायच नाही आणि सायकल हातात घेऊन अजिबात चालायचं नाही.. " मग काय. मजल दरमजल करत करत चामुंडी चढलो. फुल्ल घाम निघाला पण मजा आली. 'अपने होने पे मुझको यकीं आ गया..!' जाताना वाटेत एक 20-25 फूट "नंदी" ची मूर्ती पहिली..थोड्या थोड्या उंचीवरून मैसूर शहर पाहिलं. आणि पहिल्यांदा चामुंडी वरूनच "मैसूर पॅलेस" च दर्शन झालं. चामुंडी ला वर पोचल्या पोचल्या दोन पेग उसाचा रस हाणला. आणि मगच पुढे फिरलो. चामुंडी तस पाहता बरच गजबजलेलं देवस्थान आहे. डोंगरावर एक छान चामुंडी मातेचं मंदिर आहे.. त्याला सुंदर गोपुर आहे. डोंगरावर जास्त न रेंगाळता थोडंस क्लिक क्लिक आणि शॉपिंग करून आम्ही लगेच परतीला लागलो. येताना जीव काढणारा रस्ता जाताना सरसर सापासारखा उतरत होता. सायकल सुसाट वेग पकडत होती.. त्यामुळे दोन्ही ब्रेक्स आवळून आरामात खाली उतरलो.
हॉस्टेल ला आल्यावर मस्त थंडगार पाण्याने अंघोळ केली आणि मजबूत जेवण केलं. दुपारी तास दोन तास अराम करून cityसायकलिंग करायचा बेत होता. पण तासाभराची झोप चार तास कशी लांबली कळलंच नाही. मात्र झोप पॉटभर झाली. मग संध्याकाळी असच उगाचच लोळत पडून होतो.. रात्री जेवण झाल्यावर जरा walk केला. उद्या तस काही सायकलिंग नाहीये..काहीतरी water sports आहेत..
पण त्याआधी मला सकाळी सकाळी लवकर उठून असच सायकल फेरी मारायचीय.. कारण, त्यांनी ठरवलंय त्यापेक्षा जास्त मला सायकलिंग करायचीय..
पण त्याआधी मला सकाळी सकाळी लवकर उठून असच सायकल फेरी मारायचीय.. कारण, त्यांनी ठरवलंय त्यापेक्षा जास्त मला सायकलिंग करायचीय..
Nice bro 👍
ReplyDeleteAwesome Anand
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteN1 bhava
ReplyDeleteNice experience with grateful stamina keep going on
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteWell narrated brother! Keep wandering👍
ReplyDeleteफिरस्तीचा आनंद की आनंदची फिरस्ती
ReplyDeleteदोन्हीही...
DeleteMitra mast enjoy karatoyas tuzya sakhi barobar! Jalan Hotey. Pudhachya firasti chi waat baghatoy.
ReplyDeleteOne man show
ReplyDeleteNice
ReplyDelete