मै सू र डा य री (Day - 4)


आज लवकर बिवकर उठायची काही गरज नव्हती. कारण, आज schedule मध्ये सायकलिंग नव्हतं तर दुपारी काही water activities होत्या. त्यामुळे मी आरामात उठलो असतो तरी यांना चाललं असतं. यांना चाललं असतं पण मला चाललं नसतं. कारण इथं इतक्या दूर येऊन.. इतकी सुंदर सायकल आणि शहर असताना बिना सायकलिंगच नुसतं पडून राहणं मला तरी पटत नाही बुवा. मग काय सकाळी बरोबर 7ला नाश्ता हाणला आणि सायकल घेऊन बाहेर पडलो. (अपेक्षेप्रमाणे) कुठे जायचं होत काय बघायचं काही काही माहित नव्हतं. समोर जो रस्ता येईल, गल्ली येईल ती फिरत होतो. मग मध्येच काल राहिलेला एक तलाव फिरायचा विचार आला आणि तो शोधायला सुरुवात केली. पण त्या तलावाच नाव काही आठवत नव्हतं.. बरेच प्रयत्न केले.. मग शेवटी google केलं.. तलावाच नाव होत "कुक्कराहल्ली लेक". (अजूनही हे नाव माझं पाठ झालं नाहीये).

शोधत शोधत तिथे गेलो तर तिथला watchman मला सायकल घेऊन काही आत जाऊ देईना. खूप प्रयत्न केले पण याचं आपलं एकच "इल्ले.. इल्ले.." मग मी ही म्हटलं इल्ले तर इल्ले.. सायकल ला नाही जाऊ दिल्ले तर मी पण इल्ले. या कुक्कराहल्ली तालावाचा परिघ 4km आहे. मग मी निवांत त्या तलावाला 2 चक्कर मारले आणि सरळ हॉस्टेल गाठलं. हॉस्टेल ला तसा काही प्लॅन नव्हता, त्यामुळे दुपारच्या जेवणापर्यत नुसता लोळत पडलो. (गेल्या कित्येक जन्माची लोळण्याची हौस पूर्ण करून घेतोय मी देव जाणो..!!).


दुपारी जेवण झाल्यावर इथल्या coordinator सोबत त्याच्या बाईक ने "वरुणा लेक" गाठला. हा तलाव शहराच्या बाहेर चामुंडी डोंगराकडे आहे. वरुणा लेक वर फार काही गर्दी वगैरे नव्हती. त्यात आमचं 3 water activities करायचं ठरलं.
1. Kayaking
2. Jet ski
3. Trampoline.
आता तिथं जाण्याआधी या तिघांचा नेमका अर्थ काय ? हे हि मला माहित नव्हतं. मी कसलाही ट्रेलर न बघता डायरेक्ट पिक्चर ला गेलो होतो. सुरुवातीला Kayaking मध्ये मला एकट्याला एका छोट्या बोट मध्ये बसवलं त्याचे वल्हे माझ्याकडे दिले आणि मला पाण्यात सोडून दिलं. हा पुन्हा सायकलिंग सारखाच प्रकार झाला, कुठे जायच, कसं जायचं काही माहित नव्हतं. मी उगाच ती इवलीशी होडी चालवत हालवत अर्धा तास फिरत राहिलो. (हात दुखले ते सोडाच). नंतर गेलो Jet ski साठी. त्यात मस्त मला एका मोटर बोट मध्ये बसवलं सोबत एका 'इल्ले इल्ले' ला बसवलं. मला वाटलं चला आता माझे हात दुखणार नाहीत आणि मज्जा पण येईल. पण कसलं काय त्याने ती बोट चालू कधी केली.. एक राऊंड कधी मारला काही कळलंच नाही. Jet ski या नावाचा उच्चार जितका fast होतो त्याही पेक्षा fast हा कार्यक्रम आटोपला.

शेवटची activity होती Trampoline - साध्या भाषेत स्प्रिंग असलेल्या जाळीवर उड्या मारणे. फक्त इथे ती स्प्रिंगवाली जाळी कुठल्याही मॉल मध्ये नव्हती तर पाण्यावर तरंगती होती. मी उड्या मारायला गेलो तेव्हा माझ्या समोर competition ला 2 - 3 लहान मुलं हजर होती. मग काय मी थोडं त्यांचं निरीक्षण केलं आणि चालू झालो..टुन्नुक टुन्नुक डुब्बूक डुब्बूक मजा आली. नन्तर आम्हाला जेव्हा पाण्यात ढकललं तेव्हा मात्र माझी वाट लागली. व्यवस्थित Life jacket होतं पण तरीही माझी हालत खराब झाली होती. सगळी मंडळी मला "असं पोह, तसा हात मार, पाय असे हलव" असं काही बाही सांगत होती. पण पाण्यात मला काही काही म्हणजे काहीहीही कळत नव्हतं. 'मी हात हलवले तर पाय हलत नव्हते आणि मी पाय हलवले तर हात हलत नव्हते'. नुसता "गटांगळ्या कारभार" चालला होता माझा. शेवटी पोटभर पाणी पिऊन मी गपचूप बाहेर आलो. या साऱ्या प्रकारात मला एक गोष्ट कळली, ती म्हणजे "cycling is much easier than swimming." तास-दोनतासात जेवढी माझी energy गेली तेवढ्यात मी सहज चामुंडीला दोन राऊंड मारून आलो असतो.

पण असो.. गेली तीन दिवस मैसूर च जेवण टेस्ट करत होतो आज "मैसूरचं पाणी" पण टेस्ट केलं.

जय चामुंडी..!!






Comments

  1. Chaan Amol..

    Amhi panyavaril anand wachla !!!

    ReplyDelete
  2. Bhau tuze photos khupach chhan ahet ani tyapeksha chhan ha blog..

    ReplyDelete
  3. 1 no
    Tuzi pryci khpch mast aahi
    Chal baba 1 da tari tuzay praycila sodlas
    Sodun tichy mitrini kaday galas

    ReplyDelete
  4. आनंदा, उत्तम अनुभव आणि लिखाणही...👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts