फिरस्ती - My Journey is My Destination...!!
सर्व भटक्या-मुक्त जमातीच्या आत्म्यांना 'फिरस्ती' आनंदचा नमस्कार..!!
खरतरं, कुठल्याही आरक्षणाशिवाय, आपली जमात आज टिकून आहे, याच एकमेव कारण म्हणजे आपलं एक-कलमी धोरण - "फि..र..स्ती....!!"
तर काय आहे ही 'फिरस्ती'.. ?
एखादी travel film बघितल्यावर "आपणही बॅग भरून पळून जावं" हा विचार म्हणजे "फिरस्ती"...
'एखाद्या जंगलात रस्ता भटकून कमीतकमी महिनाभर तरी हिंडाव असं वाटणं म्हणजे "फिरस्ती''...
आणि
एखाद्या destination पेक्षा प्रवासासाठीच जास्त उत्सुक असणं म्हणजे 'फिरस्ती..!!
फिरस्ती..
म्हटलं तर एक वेड आहे
म्हटलं तर शहाणपण,
म्हटलं तर जाणतेपनी
लाभलेलं लहानपण..
माझ्यामते आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फिरस्ती प्रकरण आहे. कारण, सगळ्यांचा मुक्काम ठरलेला आहे.. पण आपण सगळे मात्र प्रवासात गुंग आहोत.
आणि हा प्रवास म्हणजेच तर 'जगणं' आहे...
पण जगताना उगाच मोठेपणाचा आव-बिव आणू नये.. कारण तो आला की प्रवासातला आनंद हरवतो.. बऱ्याचदा लहान म्हणून जगण्यात वेगळीच मस्ती असते.. आणि ती वृत्तीच फिरस्ती असते..
लहान होऊन आता थोडं
फक्त धावत सुटायचंय,
नव्या नव्या हिरवाईला
घट्ट घट्ट भेटायचयं..
मुक्कामची फिकीर नाही
फिरायचायं घाट, रस्ता,
'प्रत्येक क्षण जगायचं'
हाच आपला शिरस्ता..
वेड्यापीश्या जगामध्ये
भटक्यांची एक आहे वस्ती,
वस्तीचं त्या नाव आहे
......"फि..र..स्ती"......
मला विचाराल तर, माझा स्वभाव आणि माझी आवड दोन्ही म्हणजे फिरस्ती..!
कारण, मी एखादा महिना जरी फक्त office - home, office - home केलं तरी प्रचंड गुदमरायला होतं. आणि ज्या क्षणी मला असं वाटतं की, आता माझ्यातला फिरस्ती गुदमरतोय.. तेव्हा जे मिळेल ते वाहन घेऊन.. आणि जो होईल तो प्लॅन करून.. मी झटकन बाहेर पडतो. कधी तो एखादा ट्रेक असतो तर कधी एकांडी सायकल राईड.. प्लॅन काही हि असो ''प्रवास'' महत्वाचा. आणि याच साऱ्या प्रवासात.. कधी दमवणाऱ्या ट्रेकमध्ये किंवा कधी जीव काढणाऱ्या peddling मध्ये माझ्यातला 'फिरस्ती घेतो एक खोल श्वास "......." आणि करून देतो जाणीव स्वतःलाच स्वतःच्या "जिवंतपणाची..!!"
हा ब्लॉग दुसरं तिसरं काही नसून माझ्यातल्या फिरस्ती मनाचा तुमच्या फिरस्ती मनाशी मनमोकळा संवाद आहे.. थेट.!! खूप खूप फिरताना खूप खूप बोलावसं वाटत असतं.. अनुभवलेलं नवं नवं शब्दांत मांडावस वाटतं असतं.. त्या साठी हा प्रयत्न..!आणि खरं सांगू.. फिरताना बऱ्याचदा इतका आनंद वाट्याला येतो की, दोन्ही खिसे आणि एक अक्ख मन भरलं तरी बराच आनंद ओंजळीत उरतो..आणि तोच फिरस्ती आनंद share करण्यासाठी हा ब्लॉगरूपी खटाटोप..!!
"फिरस्ती" या नावाचं संपूर्ण श्रेय माझ्या मातोश्रीना जातं. कारण, या साऱ्या प्रवासाला "भटकंती" किंवा "सफरनामा" असं काहीतरी नाव द्यावं असं मला वाटतं होतं. पण मग मला माझ्या आईने केलेलं कौतूक आठवलं. ती प्रत्येकवेळी मी भटकायला जाताना एकचं वाक्य म्हणते, "नुसता फिरस्तीनाद लागलाय मेल्याला....!!"
आणि मला साक्षात्कार झाला...
....की आपला नाद म्हणजे 'फिरस्ती'च..!!
Tag Cloud
Firasti
Marathi Travel Blog
Cyclist
Marathi Traveler
Marathi Gypsy

![]() |
My Journey is My Destination...!! |
Tag Cloud
Firasti
Marathi Travel Blog
Cyclist
Marathi Traveler
Marathi Gypsy
क्या बात है माऊली.... फिरस्ती जगण्या पलिकडची... 😇
ReplyDeleteआनंद, एकदम कडक मित्रा 😍 तुझ्याकडून दरवेळेस काही ना काही नवीन घडत असतं, आणि ते अफलातून आणि भन्नाट असतं, फिरस्तीसाठी सदिच्छा, "प्रवास" "आनंदाचा" होवो ! 😇😎
ReplyDeleteखुपच छान आनंद दा...😍तुझ्या या फिरस्तीसाठी मनपुर्वक शुभेच्छा..हा प्रवास असाच फिरस्तीमय राहोत..😊
ReplyDeleteKhupch sunder Anand zhala sarv pravas bgun...Firasti..😍
ReplyDeleteप्रवास, तू आणि सायकल
ReplyDeleteमाहीती आहे हो तुमची दोस्ती
कवितांसाठी प्रसिद्धच तुझी हस्ती
All The Best For Your फिरस्ती👍
खुप मस्त, आनंद!
ReplyDeleteKeep writing
👍👍👍
दादा तुझं नावच आनंद नाही तुझ्यातच आनंद आहे...स्वतःला हवं ते करता येन जीवनातलं सर्वात मोठा आनंद आहे .....असाच अनुभव घेत राहा ...खूपच सुंदर 😊
ReplyDeleteवाह रे फिरस्ती !
ReplyDeleteतुझ्यासारखी नाही दुसरी कोणी हस्ती,
तुझी ही journey नक्कीच नाही सस्ती
तरीही करतोस तू खूपच मस्ती,
म्हणूनच आई बोलते तुला फिरस्ती
आनंदा..... खूपच आनंदी आहे तुझ्यावर, खरंच आयुष्य कसं जगावं ते तू आम्हाला शिकवतोस. या तुझ्या फिरस्ती प्रवासाला खूप खूप शुभेच्छा व प्रेम !
भरत सुदामती सुंदरराव कदम
ठाणे
अरे वा!!! खुप छान शब्द रचना आहे आणि कल्पना ही सुंदर आहे. पुढील प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.
ReplyDeleteअरे वा!!! खुप छान शब्द रचना आहे आणि कल्पना ही सुंदर आहे. पुढील प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.
ReplyDeleteMast re Anand as vatat lagech uthavun nighav फिरस्ती साठी.अन हे तर खूपच आवडला...( जगताना उगाच मोठेपणाचा आव-बिव आणू नये.. कारण तो आला की प्रवासातला आनंद हरवतो.. बऱ्याचदा लहान म्हणून जगण्यात वेगळीच मस्ती असते.. )
ReplyDeleteखूप मस्त आनंद,
ReplyDeleteशब्द-कविता-प्रवास-रस्ता-घाट-जंगल-ट्रेक-सायकल सगळ्या सगळ्यामध्ये तुझ्या मनातला आनंद नुसता ओसंडून वाहतोय
हसते रहो
फिरते रहो
खुपच भारी वाटल तू घेतलेला हा निर्णय आणि ब्लॉग वाचून कारण आजकाल प्रत्येकाला आपआपली आवड, छंद आणि त्यातुन मिळणारा आनंद माहित असून देखील आजच्या धावपळीच्या जगात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अत्यंत boaring जीवन जगत असतो. ज्यामुळे स्वतः सोबत नकळत दुसऱ्यांना पण boar करायला लागतो. पण तुझ्या नावाप्रमाने आणि तू घेतलेल्या निर्णयामुळे तर तू नेहमीच आनंदी राहशील आणि तुझ्या बरोबरचे कधी तुझ्यासोबत boar होणार नाहीत हे पक्क.
ReplyDeleteतुझ्या फिरस्तीसाठी 👍all the best...😊
जगण्यात ज्याच्या मस्ती
ReplyDeleteत्याची आवडच फिरस्ती
पायाने फिरू दे सायकलची चेन
हाती असू दे सिद्धहस्त पेन
फिरत रहा. लिहीत रहा.
Excellent and very unique concept you have chosen I realy appreciated about F I R A S T I that gives us refreshing and excitement movement in life ...
ReplyDeleteThanks Anand sir you are just increadebale concept start For happy Journey of Life ....
Khup mast
ReplyDeleteWah mastach , aapan jauya ekada firastiwar
ReplyDeleteNakkich
DeleteKhupach Chan dada
ReplyDeleteVery beautiful brother
ReplyDeleteVery beautiful brother
ReplyDelete